आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरचा नाद सोडावा, अपप्रचारही ‘भंगारात’, राजदूत अकबरुद्दीन यांनी पाकला सुनावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - काश्मीरप्रश्नी पाकिस्तानने कितीही कंठशोष वगैरे केला तरी जगाला त्यांचा खोटेपणा कळून चुकला आहे. अपप्रचाराचे धोरणही कधीच ‘भंगारात’ निघाले आहे. म्हणूनच शेजारी देशाने काश्मीरचा नाद सोडावा, अशा कडक शब्दांत भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी सुनावले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आम सभेतील चर्चेत पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी केलेले वक्तव्य सईद यांनी फेटाळून लावले. सध्याच्या परिस्थितीला भारताने अधिक ताणून धरले आहे, असे वक्तव्य पाकिस्तानकडून करण्यात आले होते. त्याला भारताने आक्षेप घेतला.

पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही आरोपाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच काश्मीरचा नाद सोडवा लागेल. भारताने सातत्याने पाकिस्तानशी संवादाचे धोरण ठेवले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील.
परंतु पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर वास्तवाला बदलण्याचा प्रयत्न केला. खरे तर पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे. आम्ही मध्यंतरी माझ्या देशाच्या प्रदेशाबद्दल एकाकी आवाज ऐकला होता, परंतु दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून तो आवाज आला होता. त्याला जागतिक पातळीवर काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असा टोलाही सईद अकबरुद्दीन यांनी लगावला.
बातम्या आणखी आहेत...