आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प बेजबाबदार! राष्ट्राध्यक्षांना अण्वस्त्र हल्ल्याचे अधिकार आहेत का? प्रथमच सिनेटमध्ये चिंतन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्ट महिन्यातही ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी दिली. - Divya Marathi
ऑगस्ट महिन्यातही ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी दिली.
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खरोखर एखाद्या देशावर अण्विक हल्ला करण्याचे आदेश आहेत का यावर सिनेटला चिंतन करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार येणाऱ्या वक्तव्यांवर वरिष्ठ सभागृह चिंतीत आहे. रागाच्या भरात अस्थिर होऊन ट्रम्प बेजबाबदारपणे उत्तर कोरियावर हल्ल्याचे आदेश देऊ शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, खरंच राष्ट्राध्यक्षांना अणु हल्ल्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत का? आणि ते आदेश दिल्यास लष्कराने आणि लष्करी मोहिमांच्या संचालकांनी आण्विक मिसाईल धाडावी का? यावर सिनेटमध्ये चर्चा होत आहे. अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारावर चर्चा होण्याची 40 वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये (अमेरिकन संसद) मार्च 1976 मध्ये अशा प्रकारची चर्चा भरवण्यात आली होती. 
 
> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे संरक्षण विभागाच्या सर्वच दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यांचा आदेश लष्करासाठी अंतिम आदेश असतो. 
> तरीही त्या पदावर विराजमान असलेले डोनाल्ड ट्रम्प अणु हल्ल्यावर उलट-सुलट वक्तव्ये करत असल्याने सिनेट राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांवर चर्चा करण्यासाठी विवश झाले आहे. 
> सिनेटमध्ये चर्चा सुरू असताना संरक्षण तज्ञ सी रॉबर्ट केहलर म्हणाले, ट्रम्प यांनी माझ्या कारकिर्दीत उत्तर कोरियावर अण्वस्त्र हल्ल्याचे आदेश दिले असते, तर मी ते कायदेशीर आहे किंवा नाही याची शहनिशा केली असती. केवळ राष्ट्राध्यक्षांनी आदेश दिले म्हणून, हल्ला सुरू केलाच नसता.
> केहलर 2011 ते 2013 पर्यंत अमेरिकेच्या संरक्षण विभागात लष्करी मोहिमांचे प्रमुख कमांडर होते. त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धमक्यांना बेजबाबदार म्हटले आहे. 
> तज्ञांच्या मते, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एखाद्या देशावर अण्वस्त्र हल्ला करण्याचे अधिकार घटनेने काही अटींवर दिले आहेत. त्यानुसार, संरक्षण मंत्री, सर्वच संरक्षण दलांचे प्रमुख आणि प्रत्येक सैनिक त्या हल्ल्यासाठी किंवा युद्धासाठी तयार होत नाही, तोपर्यंत राष्ट्राध्यक्ष तसे आदेश देऊ शकत नाही. त्यांचे आदेश परिस्थितीसापेक्ष असतात. केवळ राष्ट्राध्यक्षांनी बटन दाबल्याने अण्वस्त्र हल्ले होत नाहीत.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण काय म्हणाले...
बातम्या आणखी आहेत...