आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Send Your Name To Mars On NASA's Next Red Planet Mission

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळावर तुमचे नाव पाठवायचे असेल तर लवकर पाठवा; नासाचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - तुम्हाला तुमचे नाव मंगळ ग्रहावर पाठवायचे आहे काय? तुमची इच्छा अमेरिकी अंतराळ संस्था, नासा हे नाव मंगळावर पाठवू शकते.

मंगळ ग्रहाच्या भूगर्भाच्या अभ्यासासाठी नासा मार्च २०१६ मध्ये इनसाइट मिशनअंतर्गत एक यान पाठवत आहे. तुमचे नाव एका संगणक चिपमध्ये नोंदले जाईल आणि ही चिप मोहिमेवर जाणाऱ्या यानात असेल. मोहिमेवर जाणारे यान ४ मार्च २०१६ रोजी कॅलिफोर्नियाच्या वांदेनबर्ग हवाई दलाच्या तळावरून अॅटलस व्ही ४०१ रॉकेटच्या साहाय्याने प्रक्षेपित केले जाईल. चाचण्यांच्या मालिकेअंतर्गत अंतराळ यानातील सौर बॅटरीला क्लीन रूममध्ये बसवण्याची चाचणी घेण्यात आली आहे. ही बॅटरी पृष्ठभागावर बसवण्यात येईल.