आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसचा म्होरक्या अबू अल अाफरीचा खात्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- आयएसआयएसचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या अबू अल आफरी ऊर्फ अब्द अल रहेमान मुस्तफा मोहंमद उत्तर इराकमध्ये दहशतवादविरोधी पथकांनी केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेल्याचा दावा इराक सरकारने केला. अमेरिकेने याला दुजोरा दिलेला नाही.

न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इराकच्या संरक्षण मंत्रालयाने हा दावा केला. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने केलेल्या हवाई हल्ल्यात आफरी मारला गेल्याचे वृत्तात म्हटले आहे. तल अफर येथील ज्या मशिदीवर हा हल्ला करण्यात आला तेथे आफरी इतर काही सहकाऱ्यांसोबत होता. याबाबतचे व्हिडिओ चित्रणही इराक सरकारने जाहीर केले आहे.

अमेरिकेचा दुजोरा का नाही? सुरक्षा आघाडीचे प्रवक्ते मेजर कर्टिस जे. केलॉग यांच्यानुसार, या व्हिडिओमध्ये कुठेही पडलेली इमारत मशीद असल्याचे जाणवत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ताफ्याने अद्याप कोणत्याही मशिदीवर कधी हवाई हल्ला केलेला नाही. शिवाय इराकी अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा असे चुकीचे दावे केले होते.

७० लाख डॉलर बक्षीस
आफरीच्या डोक्यावर अमेरिकी सरकारने ७० लाख डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. एकीकडे आयएसचा संस्थापक बगदादी पंगू होऊन पडलेला असताना आफरी मारला गेला तर संघटनेला मोठा धक्का बसणार आहे.