आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेनाने पाठलाग करून पकडला मोबाइलचोर, म्हणाली पंगा घ्याल तर याद राखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोराला पाठलाग करून पकडल्यानंतर सेरेनाने फेसबुक पेजवर पोस्ट केलेली ‘सुपर गर्ल’ सेरेना. - Divya Marathi
चोराला पाठलाग करून पकडल्यानंतर सेरेनाने फेसबुक पेजवर पोस्ट केलेली ‘सुपर गर्ल’ सेरेना.
सॅन फ्रान्सिस्को - टेनिस कोर्टावरील चपळाईने जगाला माहीत असलेली नंबर एकची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने आपण टेनिस कोर्टाबाहेरही तेवढेच चपळ असल्याचे दाखवून दिले आहे. एका रेस्टॉरंटमध्ये सेरेना जेवण करत असताना एका चोराने तिचा मोबाइल लांबवला. ते लक्षात येताच सेरेनाने पाठलाग करून चोराला पकडले आणि मोबाइल परत मिळवला. २१ ग्रँडस्लॅम जिंकलेली सेरेना आपल्या या शौर्यावर एकदम खुश आहे. इतकी की तिने स्वत:ला ‘सुपरगर्ल’चा किताबही देऊन टाकला आहे. एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या या घटनेवर ३४ वर्षीय सेरेनाने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती सुपरगर्लच्या गणवेशातच दिसत आहे. या घटनेचा तपशील तिच्याच शब्दांत....
‘मंगळवारी एका डिनरच्या वेळी माझ्यासोबत एक गमतीदार घटना घडली. मी चायनीज फूडचा आनंद घेत होते. एक जण माझ्या बाजूलाच बसला होता. त्याच्याबाबत मला शंका आली. आपण त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे, असे मला एकदमच वाटू लागले. तुम्ही याला माझा ‘सुपरहीरो सेन्स’म्हणू शकता. माझा फोन खुर्चीवर होता. परंतु मला अवघडल्यासारखे वाटत होते. अचानक त्या व्यक्तीने माझा फोन उचलला आणि तो झपाझप पावले टाकत निघून जाऊ लागला. मी तिकडे पाहिले आणि जोरात ओरडले, ओ माय गॉड! तो माझा फोन घेऊन गेला.’
मी लगेच पळत रेस्टॉरंटच्या बाहेर आले आणि त्याचा पाठलाग सुरू केला. त्याने पळायला सुरुवात केली. परंतु मी त्याच्यापेक्षा जास्त वेगाने पळत सुटले आणि मी त्याला पकडले. अचानक ती व्यक्ती म्हणाली,‘ मी काय केले हे तुला माहीत आहे. मी खूपच भ्रमिष्ट झालो होतो आणि चुकून मी तुझा फोन उचलला.’ जेव्हा मी रेस्टॉरंटमध्ये परत आले तेव्हा तेथील लोकांनी उभे राहून मला अभिवादन केले. मी जे काही केले त्याचा मला अभिमान वाटला. महिलांसाठी हा एक विजयच होता! मेस विथ सेरेना अॅट युवर ओन पेरिल!! (सेरेनाशी पंगा घ्याल तर याद राखा)’ त्या मोबाइलचोराशी उगाच वाद वाढवायला नको म्हणून सेरेनाने पोलिसांत तक्रार वगैरे दिली नाही. पण सुपरगर्लच्या अाविर्भावात ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
बातम्या आणखी आहेत...