आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल सर्चच्या निर्मात्यावर गंभीर आरोप, उबेरने केले बडतर्फ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशीत जन्मलेले आणि हिमालयाच्या तराई भागात वाढलेले अमित सिंघल यांचे बालपण दूरदर्शनवर त्या दिवसांत येणाऱ्या “स्टार ट्रेक’ या मालिकेने फारच प्रेरित होते. ही मालिका विज्ञानाशी संबंधित होती. यातून अमित यांची विज्ञानाबाबत जिज्ञासा वाढली. आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर रुरकी आयआयटीत त्यांनी प्रवेश घेतला.
 
अमेरिकेत निघून गेले. दोन सुटकेस घेऊन अमेरिकेत त्यांच्या स्वप्नाला पंख फुटले. गुगलच्या काही काळ पूर्वी एटीअँडटी प्रयोगशाळेत १९९६ मध्ये नोकरीच्या बाजूने अंतत: २००० मध्ये गुगलमध्ये आले. खरे पाहता त्यांचे मित्र कृष्ण भरत यांनीच त्यांना गुगलमध्ये भरती केले. कृष्ण त्यांच्यापेक्षा दोन वर्षांहून लहान आहेत आणि गुगल न्यूजसाठी काम करत होते.   

अमितला एम्प्लॉई क्रमांक मिळाला १७६. ते दीड दशकापर्यंत गुगलमध्ये राहिले आणि त्यांनी गुगलचे सर्च विकसित केले. अमेरिकी वृत्तपत्रात त्यांच्याबाबत मास्टर ऑफ गुगल रँकिंग अल्गोरिदम म्हटले जात होते. लोक सर्चमध्ये प्रश्न टाकत असत आणि गुगल त्याचे तत्काळ उत्तर देत असे. याप्रमाणे अमितचे बालपणाचे स्वप्न साकार झाले. यामुळे गुगलची लोकप्रियता इतकी वाढली की लोक सर्च शब्द सोडून हेच उदाहरण देऊ लागले, हे तंत्रच सांगू लागले - गुगल करून पाहा.
 
यात दर महिन्याला १०० अब्जांहून अधिक सर्च होताहेत आणि २०१३ मध्ये याचा महसूल ३.३ लाख कोटी रुपये होता. जानेवारी २०१७ मध्ये अमिताभ अचानक गुगलमध्ये १६ वर्षांतील बनवलेले करिअर सोडून उबेर मध्ये आले. ते कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून आले. एकच महिना काम केले आणि उबेरमधून त्यांना हटवण्यात आले.
 
त्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी उबेरमध्ये हे सांगितले नव्हते की लैंगिक शोषणाच्या कारणाने त्यांनी गुगल सोडले होते. तथापि, अमित या प्रकारच्या सर्वच आरोपांचा इन्कार करत राहिले; पण उबेरच्या मताप्रमाणे ते त्यांच्या उत्तम प्रतिमेसाठी संघर्ष करत आहेत आणि ते कोणत्याही वादामध्ये पडू इच्छित नाहीत.
बातम्या आणखी आहेत...