आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धोकादायक खाणीतून असे काढले जायचे सोने, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- जगातील सर्वाधिक बदनाम सोन्याची खाण सेरा पेलादा आज प्रदूषित पाण्‍याचा तलाव बनला आहे. एकेकाळी सोने काढण्‍यासाठी येथे हजारो लोकांमध्‍ये स्पर्धा चालायची. गर्दी इतकी होती की कायदा सुव्यवस्थेसाठी लष्‍कराला पाचारण करावे लागेल. हे ठिकाण ब्राझीलमध्‍ये अॅमेझॉन नदीपासून दक्षिणेला 430 किलोमीटर अंतरावर आहे. चित्रपट निर्माता अल्फ्रेडो जार आणि सेबस्तियो सल्गादोने या खाणीची अनेक छायाचित्रे कॅमे-यात कैदी केली, जी बरीच लोकप्रिय झाली. एक आठवड्यात सोने शोधण्‍यासाठी पोहोचले हजारो लोक...
 
- जानेवारी 1979 मध्‍ये एक स्थानिक शेतकरी जेनेसियो दि सिल्वाने एका भूगर्भशास्त्रज्ञाला सांगितले, की त्याच्या शेतात बरेच सोने आहे. 
- वास्तविक त्याच्या जमिनीजवळ छोट्या नदीत एक चिमुकल्याला 6 ग्रॅमच्या सोन्याचा तुकडा मिळाला होता. या आधारावर त्याने जमिनीत सोने दडलेले असण्‍याचा अंदाज लावला होता. 
- लवकरच ही बातमी आसपासच्या भागात वा-याप्रमाणे पसरली. एक आठवड्यात येथे सोन्याच्या शोधासाठी हजारो लोक पोहोचले. 
- पाच आठवड्यानंतर येथे 10 हजारांपेक्षा जास्त लोक आले होते. 
- ज्याला जिथे जागा मिळाली, तिथे खोदायला सुरुवात केली. 
- मोठ्या संख्‍येत लोक मजूरांच्या मदतीने 2-3 मीटर एरियात खोदायला लागले. 1980 पर्यंत येथे 4 हजारांपेक्षा वेगवेगळ्या ब्लॉक्स बनले होते. यात हजारो मजूद खोदत होते. 
- सुरुवातील मोठ्या संख्‍येत सोन्या तुकडेही मिळाले. येथे मिळालेल्या सर्वात मोठ्या सोन्याचा तुकडा 6.8 किलोग्रॅमचा होता. 
- 1986 मध्‍ये आलेल्या पूरामुळे खाण खोदण्‍याचे काम बंद झाले. या सहा वर्षांत 44.5 टन सोने खाणीतून काढले गेले. 90 टक्क्यांपेक्षा जास्त सोन्याची तस्करी करण्‍यात आली आणि ते काळ्या बाजारात विकले गेले. 
- लष्‍कराने खाणीवर दारु आणि महिलांना येण्‍यास बंदी घातली. यामुळे आसपासच्या भागात वेश्‍याव्यवसाय आणि गुन्हेगारी प्रचंड वाढली होती. येथे प्रत्येक महिन्यांत जवळजवळ 60-70 हत्यांचे प्रकरण समोर आले होते. 
- सोन्याच्या खोदकामात पारा वापरल्याने आसपासचा भाग विषारा बनला आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, कसे एकाच वेळी हजारो लोक खाणीतून सोने काढायला बाहेर पडले...
बातम्या आणखी आहेत...