आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमनमध्‍ये IS चे 7 हल्‍ले: 43 जण ठार, फूड पााकिटांमध्‍ये लपवले होते बॉम्‍ब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सना- यमनच्‍या मुकल्ला शहरात सोमवारी साखळी स्‍फोट झाल्‍याने 43 लोक ठार झाले आहेत. ISIS च्‍या दहशतवाद्यांनी चार आत्‍मघाती स्‍फोटांसह एकूण सात ब्‍लास्‍ट केले आहेत. इंटेलिजंस ऑफिस, आर्मी बराक आणि चेकप्वाइंट्सला हल्‍लेखोरांनी लक्ष्‍य केले होते. चेकप्वाइंट्सवर इफ्तारदरम्‍यान झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या वेळी दहशतवादी फूड पॅकेट्समध्‍ये बॉम्‍ब घेऊन पोहोचले होते.
- स्‍थानिक वृत्‍तवाहिनीच्‍या महितीनुसार, चार बॉम्‍ब स्‍फोट सिक्युरिटी चेकप्वाइंट्सवर करण्‍यात आले.
- एक लोकल पत्रकाराने सांगितले की, दहशतवादी इफ्तारच्‍या आधी चेकप्वाइंट्सवर फूड पॅकेट्स देण्‍यासाठी पोहोचले होते.
- एक आत्‍मघाती दहशतवादी सुसाइड बेल्ट घेऊन आला होता.
- तर, स्फोटकांनी भरलेल्‍या कारव्‍दारे मिलिट्री इंटेलिजंस हेडक्वार्टरवर स्‍फोट घडवून आणला.
- मृतांमधील अधिकाधिक सैनिक हे एलिट यूनिटचे होते.
- या हल्‍ल्यामध्‍ये 10 जण जखमी झाल्‍याची माहिती आहे.
28 लाख लोकांनी घर सोडले..
- अल-कायदाच्‍या समर्थक गटाने मुकल्ला शहरावर ताबा मिळवला होता, हा ताबा सौदी सैन्याने सोडवला होता.
- अल-कायदा आणि आयएसआयएस, दोन्‍ही गटांकडून येथे हल्‍ले झाले आहेत.
- यमनच्‍या हिंसेमध्‍ये आतापर्यंत 6,400 लोक ठार झाले आहेत. ज्‍यामध्‍ये अधिकाधिक जण हे सामान्‍य नागरिक आहेत.
- यूएनच्‍या माहितीनुसार, सिव्‍हि वॉरमुळे 28 लाखहून अधिक लोकांनी घर सोडले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, स्‍फोटाचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...