आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Year Old Boy Having 50 Surgery's On Face To Getting Fresh Face

सातव्या वर्षी ५० शस्त्रक्रियांनंतर नवीन चेहरा, लंडनमध्ये ‘एपर्ट सिंड्रोम’ने पीडित चिमुकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - एका लहानग्या मुलाचा चेहरा चांगला करण्यासाठी आतापर्यंत ५० हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या. सातवर्षीय बिली मिशेलची ही शोकांतिका आहे. तो जन्मापासूनच ‘एपर्ट िसन्ड्रोम’ नावाच्या आजाराने पीडित आहे. हा विचित्र दुर्धर आजार आहे. त्यात डोके, चेहरा आणि हात-पाय योग्य प्रकारे कार्य करत नव्हते. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यादरम्यान डोक्यात ताप, ब्रेन अटॅक, रक्त वाहणे आणि मृत्यूची भीती होती. अशा स्थितीतही बिली डगमगला नाही. बिलीला आता त्याचा नवा चेहरा आवडू लागला आहे. त्याची आई डिनाइस म्हणते, मी त्याला जन्माला आल्यानंतर बघितले तेव्हा त्याच्याविषयी खूप प्रेम दाटून आले. परंतु तो खूप आजारी वाटू लागला. त्याची त्वचाही प्लास्टिकसारखी वाटू लागली. त्याचा पाय आणि अंगठा चिकटल्याचे मला दिसून आले होते. आता त्याला नवा चेहरा मिळेल.

आजारामध्ये गर्भातच बाळाची हाडे वितळल्यासारखी होतात. त्यामुळे हाडांच्या सामान्य विकासात अडथळा येऊ लागतो. हा गरोदरपणातील दोष आहे. या प्रकारच्या आजारातील मुलांचे डोळे उथळ स्वरूपाचे असतात. अशा मुलांचे दात आणि जबड्यांच्या रचनेतही विकार दिसून येतात. रुग्ण जिवंत राहण्याची शक्यता कमी सांगितली जाते. बिलीच्या बाबतीत डॉक्टरांना तो एक रात्रदेखील जिवंत राहू शकेल, असे वाटत नव्हते.

टायटॅनियम धातूने जोडले डोके
२०१२ च्या उन्हाळ्यात बिलीवर एक कठीण शस्त्रक्रिया करण्यात आली. ती नऊ तास चालली होती. त्यात सर्जननी त्याच्या डोक्याची उजवी बाजू काढून ठेवली आणि त्याची नव्याने बांधणी केली. त्यासाठी टायटॅनियम धातूच्या स्प्रिंगचा वापर करण्यात आला आहे. बिलीचा आगामी विकास होत राहिला पाहिजे. त्यात अडथळा येता कामा नये, असे डॉक्टरांसमोरचे आव्हान होते. त्याशिवाय त्याचा चेहरा कापून नव्याने जाेडण्यात आला. त्यात माथा, भुवयांचा भाग, जबडा यांचीही फेररचना करण्यात आली.

बोटे वेगळी - बिली १७ महिन्यांचा झाल्यानंतरच सर्जन त्याची चिकटलेली हाताची बोटे वेगळी करण्यासाठी तयार झाले. त्यानंतर पायाची बोटे वेगळी करण्यात आली. त्यासाठी दुस-यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली.