आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Several Blast Rocks Egypts Capital Kahira, Many Died

इजिप्त : नॅशनल सेक्युरिटी बिल्डिंगजवळ स्फोट, अनेक ठार झाल्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटानंतर सोशल मिडियावर शेअर झालेला फोटो. - Divya Marathi
स्फोटानंतर सोशल मिडियावर शेअर झालेला फोटो.
काहिरा - इजिप्तची राजधानी काहिराला लागून असलेल्या शुव्रा अल-खीमा परिसरात नॅशनल सेक्युरिटी बिल्डिंगजवळ बॉम्बस्फोट झाल्याची बातमी आहे. एका टिव्ही रिपोर्टनुसार एकापाठोपाठ एक असे जवळपास तीन स्फोट या परिसरात झाले. यात अनेक जण ठार आणि जखमी झाले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. स्फोट झालेल्या परिसरात आजुबाजुच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. स्फोट एवढे मोठे होते की जवळपास संपूर्ण शहरामध्ये त्याची तीव्रता जाणवली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हे बॉम्ब कारमध्ये पेरण्यात आले होते. घटनास्थळी अनेक अॅम्ब्युलन्स पोहोचल्या आहेत.

इजिप्तमध्ये गेल्या काही काळामध्ये अनेक हल्ले आणि हत्यांच्या घटना घडल्या आहेत. त्याच स्थितीमध्ये आता हे हल्लेही झाले आहेत. काही दिवसांपूर्वी काहीरामध्येच कार बॉम्बद्वारे इजिप्तच्या अॅटॉर्नी जनरलची हत्याही करण्यात आली होती. यापैकी अनेक हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली होती. इजिप्तमध्ये याच महिन्यात दहशतवादाच्या विरोधात एका नव्या कायद्याला मंजूरी देण्यात आली आहे.

पुढील स्लाइड्सवर संबंधित PHOTO