आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच अाेपन : शारापाेवा, मरे विजयी; महिला गटात पेत्रा क्विताेवाची चाैथ्या फेरीत धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - गत चॅम्पियन मारिया शारापाेवा, जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक, अँडी मरेने फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेत अागेकूच केली. दुसरीकडे विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्विताेवाने शानदार विजयासह महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये धडक मारली. इटलीच्या सारा इराणीने महिला एकेरीची चाैथी फेरी गाठली. तिने तिसऱ्या फेरीत इंग्लंडच्या अांद्रिया पेत्काेविकवर ६-३, ६-३ अशा फरकाने मात केली.

जगातील माजी नंबर वन मारिया शारापाेवाने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत शानदार विजयाची नाेंद केली. तिने सामन्यात अाॅस्ट्रेलियाच्या समंथा स्टाेसूरवर एकतर्फी विजय मिळवला. तिने ६-३, ६-४ अशा फरकाने सामना अापल्या नावे केला. यादरम्यान अाॅस्ट्रेलियाच्या खेळाडूने विजयासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. तिला रशियाच्या शारापाेवाला राेखण्यात अपयश अाले. गतविजेत्या शारापाेवाने सरस खेळी करताना सहज सामना अापल्या नावे केला. तिला दुसऱ्या सेटवर काहीशी झुंज द्यावी लागली. मात्र, तिने अापल्या अाक्रमक सर्व्हिसच्या बळावर सामना अापल्या नावे केला. अाता शारापाेवाचा चाैथ्या फेरीतील सामना १३ व्या मानांकित लुसिया सफाराेवाशी हाेईल. चेक गणराज्यच्या खेळाडूला धूळ चारल्यास शारापाेवाला अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित करता येणार अाहे.

याेकाेविकचा शानदार विजय
अव्वल मानांकित नाेवाक याेकाेविकने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत शानदार विजय मिळवला. त्याने सामन्यात अाॅस्ट्रेलियाच्या थानासी काेक्किनाकिसवर मात केली. सर्बियाच्या खेळाडूने ६-४, ६-४, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. या विजयासह त्याला अंतिम १६ मध्ये प्रवेश करता अाला. अाता चाैथ्या फेरीत योकोविकचा सामना रिचर्ड गास्केट किंवा केविन अँडरसन यांच्यातील विजेत्याशी हाेईल.

मरे अंतिम १६ मध्ये
तिसऱ्या मानांकित अँडी मरेने पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये धडक मारली. त्याने तिसऱ्या फेरीतील सामन्यात अाॅस्ट्रेलियन युवा टेनिसपटू निक क्रायगिसवर मात केली. त्याने ६-४, ६-२, ६-३ ने शानदार विजयाची नाेंद केली. या वेळी २० वर्षीय निकने दिलेली झुंज अपयशी ठरली. मात्र, त्याने शानदार कामगिरीच्या बळावर चाहत्यांची मने जिंकली. त्याने दुसऱ्या विजयासह अंतिम ३२ मध्ये धडक मारली हाेती.

पेत्राचा इरिनावर विजय
विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्विताेवाने ५८ मिनिटांमध्ये महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामना जिंकला. तिने सामन्यात राेमानियाच्या इरिना कॅमेलियाला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. चाैथ्या मानांकित पेत्राने ६-३, ६-२ ने सामन्यात विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...