आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत पोहोचताच शरीफ यांनी आळवला ‘काश्मीर राग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अमेरिकेत पोहोचताच पुन्हा काश्मीर राग आळवण्यास सुरुवात केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील युवकांनी स्वातंत्र्याच्या लढाईत नवे प्राण फुंकले आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. ते २१ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. शरीफ रविवारी रात्री उशिरा न्यूयॉर्कला पोहोचले. परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी सांगितले की, या वेळी काश्मीर मुद्दा उपस्थित करणे हेच शरीफ यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. भारत काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन करत असून ते थांबवावे, असे पत्र त्यांनी सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्य देशांच्या राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. शरीफ म्हणाले की, जगाने दहशतवाद आणि स्वातंत्र्याची लढाई यात फरक करावा लागेल. जगाने संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव लागू करून जम्मू-काश्मीरच्या लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यावा.
बातम्या आणखी आहेत...