आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनामा प्रकरण: शरीफ यांच्या भावाची जेआयटीपुढे हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पनामापेपर प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी संयुक्त चौकशी समितीसमोर (जेआयटी) हजेरी लावली. परंतु, आपल्याला चौकशीसाठी नव्हे तर या विषयाचा अभ्यासक या नात्याने बोलावण्यात आले होते, असा शाहबाज शरीफ यांनी दावा केला आहे. ते पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर या प्रकरणात थेट आरोप नाहीत. मात्र, काही सुगावा लागेल यासाठी त्यांची जेआयटीकडून चौकशी सुरू आहे.

शाहबाज शरीफ शनिवारी मुलगा शहबाज, पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अाणि अर्थमंत्री इशाक डार यांच्यासोबत केंद्रीय न्यायिक अकादमीत (एफजेए) पोहोचले.
जेआयटीने या आठवड्याच्या सुरुवातीलाच शाहबाज यांना चौकशीसाठी समन्स जारी केले होते. काही दिवसांपूर्वीच जेआयटीने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची चौकशी केली होती.
बातम्या आणखी आहेत...