(फोटो: 'ब्रिटनने वसाहतवादाची नुकसान भरपाई द्यावी' या विषयावर बोलताना शशी थरूर)
माय डियर फ्रेंड्स...
ब्रिटिश भारतात आले तेव्हा जागतिक बाजारात आमचा वाटा युरोपएवढा म्हणजे २३% होता आणि जेव्हा इंग्रज गेले तेव्हा तो फक्त ४% राहिला होता. ब्रिटनच्या भल्यासाठी इंग्रज भारतात आले. भारताच्या निराैद्याेगिकीकरणामुळे ब्रिटनचे औद्योगिकीकरण झाले.
१९ व्या शतकाच्या शेवटापर्यंत भारत ब्रिटनची मोठी कामधेनू होती. ब्रिटनच्या प्रशासकीय सेवेत सर्वात जास्त पगाराची नोकरी भारतच देत होता. आम्ही तुम्हाला आमच्यावरील अत्याचाराचेही पैसे दिले. भारताचे विणकर जगभर प्रसिद्ध होते. तुम्ही आमच्या विणकरांची मोडतोड केली, त्यांच्यावर कर लादला. आमचा कच्चा माल आणला. तुमच्या येथे कपडे तयार केले. जगभर विकले आणि भारतीय विणकर भिकारी बनले. निर्यातदार भारत आयातदार बनला. भारताचा जागतिक बाजार २७% होता. तो २% पेक्षाही कमी राहिला. ब्रिटिशांनी आपल्या शब्दकोशात वर्तनातही ‘लूट’ शब्द घातला. लॉर्ड क्लाइव्ह तर भारताला लुटण्यासाठी प्रशाकीय कौशल्यासह आले होते. जालियनवाला बागेत हजारो लोक मारले. ब्रिटिश सत्तेवर सूर्यास्त होत नाही, हे म्हणणे खरेच. कारण अंधारात ईश्वरही ब्रिटिशांवर विश्वास ठेवत नव्हता. ब्रिटिशांनी जेवढी युद्धे लढली, त्यात १/६ जवान भारतीय होते. ५४ हजार भारतीय मारले गेले आमच्याकडूनच १०० दशलक्ष पाउंड कर वसूल केला. भारताने कोटी स्फोटके, लाख रायफली-मशीनगनचा पुरवठा केला. तरीही भारताकडून अब्ज पाउंड्स घेतले. दुसऱ्या महायुद्धात भारताने १.२५ अब्ज पाउंड्स दिले. ब्रिटिशांनी भारतीयांच्या पैशाने स्कॉटलंडची गरिबी संपवली. रेल्वे रस्ते भारतीयांसाठी नव्हे, तर बंदरांपर्यंत सामान नेण्यासाठी बांधले होते.
भारतीय रेल्वे हा तर घोटाळाच होता. कॅनडा- ऑस्ट्रेलियात एक मैल लोहमार्गासाठी जेवढा खर्च आला त्याच्या दुप्पट भारतात लागला. तुम्ही ब्रिटन देते त्या मदतीच्या बाता मारता... ब्रिटनकडून जीडीपीच्या ०.४% मदत दिली जाते. त्यापेक्षा जास्त तर भारत सरकार खतावर सबसिडी देते. ब्रिटिश राजवट भारतीयांसाठी लूट, हत्या रक्तपाताचा इतिहास आहे. आम्ही जे तुम्हाला दिले, ते तुम्ही परत करूच शकत नाही. किमान कोहिनूर हिरा तरी परत द्या. आम्ही तुमच्याकडून स्वातंत्र्य हिसकावून घेतले. नुकसान भरपाई देण्यापेक्षाही ब्रिटनने प्रायश्चित्त करणे महत्त्वाचे आहे.’
थँकयू...
8.76 लाख यूट्यूब दर्शक
14000 लाइक्स, 6 हजार शेअरिंग, 4 टॉप ट्रेंड फेसबुकवर
ऑक्सफर्ड युनियन सन १८२३ मध्ये स्थापन झाली होती. केंब्रिज विद्यापीठाच्या युनियननंतर ही जगातील सर्वात प्रतिष्ठित डिबेट सोसायटी आहे. येथे होणाऱ्या चर्चेकडे जागतिक दृष्टिकोनातून पाहिले जाते. जगातील अनेक नेत्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. तीन अमेरिकी अध्यक्ष, तीन ब्रिटिश पंतप्रधानांसह मदर तेरेसा, दलाई लामांसारख्या हस्तींनी येथे वादविवाद रंगवले आहेत.
जेथे भाषण दिले ती संस्था २०० वर्षे जुनी
ब्रिटिश राजवटीत १.५ ते २.९ कोटी भारतीय उपाशी मेले. दुसऱ्या महायुद्धात ४० लाख भारतीयांचा मृत्यू भूकेमुळे झाला. चर्चिलने आपले भांडार भरण्यासाठी उपाशी लोकांचा घास हिसकावला. त्यांना विचारले तेव्हा त्यांनी फाइलच्या मार्जिनवर लिहिले होते की, ‘... मग आजवर गांधी का नाही मेले ?’
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शशी थरुर यांचे संपूर्ण भाषण....