आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्ल हार्बरप्रकरणी शिंजो अॅबे माफी मागणार नाहीत, युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहणार श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे या महिन्याच्या शेवटी पर्ल हार्बरमध्ये फक्त युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहतील. ते तेथे जपानी हल्ल्यासाठी माफी मागणार नाहीत. जपान सरकारच्या मुख्य प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली.

मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव योशिहिदे सुगा यांनी मंगळवारी सांगितले की, ‘अॅबे यांच्या या दौऱ्याचा मुख्य हेतू युद्धात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे हा आहे, माफी मागणे हा नाही.’ अॅबे यांनी सोमवारी अचानक घोषणा केली होती की, ते या महिन्याच्या अखेरीला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली आणि पर्ल हार्बरलाही जातील. अॅबे-ओबामा २७ डिसेंबरला पर्ल हार्बरमध्ये आयएसएस अॅरिझोना मेमोरियलवर भेट घेणार आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या दोन दिवस आधी अॅबे यांनी ही घोषणा केली होती.

बराक ओबामा सहा महिन्यांपूर्वी हिरोशिमाला गेले होते. तेथे अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. तेथे जाणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष आहेत. त्यांनीही तेथे फक्त श्रद्धांजलीच वाहिली होती, माफी मागितली नव्हती.
| टोकियो
जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे या महिन्याच्या शेवटी पर्ल हार्बरमध्ये फक्त युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहतील. ते तेथे जपानी हल्ल्यासाठी माफी मागणार नाहीत. जपान सरकारच्या मुख्य प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली.

मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव योशिहिदे सुगा यांनी मंगळवारी सांगितले की, ‘अॅबे यांच्या या दौऱ्याचा मुख्य हेतू युद्धात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे हा आहे, माफी मागणे हा नाही.’ अॅबे यांनी सोमवारी अचानक घोषणा केली होती की, ते या महिन्याच्या अखेरीला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली आणि पर्ल हार्बरलाही जातील. अॅबे-ओबामा २७ डिसेंबरला पर्ल हार्बरमध्ये आयएसएस अॅरिझोना मेमोरियलवर भेट घेणार आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या दोन दिवस आधी अॅबे यांनी ही घोषणा केली होती.

बराक ओबामा सहा महिन्यांपूर्वी हिरोशिमाला गेले होते. तेथे अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. तेथे जाणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष आहेत. त्यांनीही तेथे फक्त श्रद्धांजलीच वाहिली होती, माफी मागितली नव्हती.
बातम्या आणखी आहेत...