आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने अशी करुन ठेवली आहे बलुचिस्तानची अवस्था, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलुचिस्तानमधील छत नसलेल्या शाळेची स्थिती. - Divya Marathi
बलुचिस्तानमधील छत नसलेल्या शाळेची स्थिती.
इंटरनॅशनल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख आल्यानंतर पाकिस्तानमध्‍ये विरोधाचे सूर तीव्र झाले आहेत. जगभरात बलूच नेते येथे होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात निदर्शने करत आहेत. हा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्‍द आहे. असे असताना बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वात गरीब प्रांत आहे. पाक सैनिक करत आहे सामान्य जनतेचे शोषण...
- पाकिस्तानचे केंद्रीय सरकार त्रास देत असून आम्ही आमच्या हक्कांपासून वंचित आहोत.
- या विरोधात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी व लष्‍कर ए बलुचिस्तानसारख्‍या फुटीरवादी गट नियमित स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत.
- दुसरीकडे पाक सैनिकांनी फुटीरवाद्यांविरोधात युध्‍द पुकारले आहे. मोठ्याप्रमाणावर लष्‍करी अभियान सुरु आहे.
- परिणामी पाक सैनिक येथे अपहरण, शोषण आणि हत्या करत आहे. यावरुन पाकिस्तानविरोधात सूर तीव्र होत आहे.
- बलूच नेता नायला कादरी म्हणाले होते, की बलुचिस्तानमध्‍ये पाकिस्तान रासायनिक शस्त्रांचा वापर करत आहे. येथे लोकांबरोबर चिमुकल्यांचाही बळी घेतला जात आहे.
- बलुचिस्तानमधील लोक अनेक दशकांपासून नाराज आहेत.
गरिबी आणि बेरोजगारी उच्च पातळीवर
- बलुचिस्तानमध्‍ये गरिबी व बेरोजगारीचे चित्र आणखी चक्रावून देणारे आहे.
- 2013 मध्‍ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, येथे 46.68 टक्के लोकसंख्‍या दारिद्र्य रेषे खाली जीवन जगत आहेत.
- बलुचिस्तान नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दृष्‍टीने श्रीमंत देश असूनही पाकिस्तानमधील हा सर्वात गरीब राज्य आहे.
- पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, प्रांतात रोजगार मिळण्‍याची संधी केवळ 4 टक्के आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...