आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी म्हणायचे रेपमुळे मिळेल जन्नत, IS च्या तावडीतून बचावलेल्या तरुणींची आपबिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर इराकच्या कुर्दिस्तानमध्ये एका रेफ्युजी कँपमध्ये बसलेली मुलगी. (फोटो : द न्यूयॉर्क टाइम्स) - Divya Marathi
उत्तर इराकच्या कुर्दिस्तानमध्ये एका रेफ्युजी कँपमध्ये बसलेली मुलगी. (फोटो : द न्यूयॉर्क टाइम्स)
बगदाद - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या तावडीतून बचावलेल्या काही यहुदी मुलींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती कथन केली आहे. 11 महिने दहशतवाद्यांच्या तावडीत राहिलेल्या एका 12 वर्षे वयाच्या मुलीने सांगितले की, "मी त्याला (दहशतवादी) सांगायचे की मला त्रास होतो. असे करू नका. त्यावर तो मला म्हणायचा इस्लाममध्ये काफीरांवर बलात्कार करणे हा गुन्हा नाही. माझा रेप केल्याने त्याला जन्नत मिळेल असे तो म्हणायचा. ISIS च्या दहशतवाद्यांनी गेल्यावर्षी यहुदी समुदायाच्या 5000 पेक्षा अधिक महिलांचे अपहरण केले होते.

दहशतवादी म्हणायचा, रेप करणे म्हणजे अल्लाहच्या प्रार्थनेसारखे
द न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार सध्या या मुली एका रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत आहेत. नऊ महिने दहशतवाद्याच्या कैदेत राहणाऱ्या 15 वर्षांच्या एका मुलीने सांगितले की, दहशतवादी धार्मिक पुस्तकाचा हवाला देऊन बिगर मुस्लीम धर्मातील महिलांवर हल्ला करणे आणि त्यांच्याबरोबर बळजबरीने संबंध प्रस्थापित करणे हे योग्य असल्याचे सांगत आहेत. तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी दहशतवादी प्रत्येकवेळी नमाज पठन करायचा. या मुलीने सांगितले की, दहशतवादी तिला म्हणायचा बलात्कार करणे म्हणजे अल्लाची प्रार्थना करण्यासारखे आहे.

गर्भवती महिलांना वेगळे ठेवायचे
दुसऱ्या एका पीडितेने सांगितले की तिला जवळपास 500 मुलींबरोबर एका बहुमजली इमारतीमध्ये ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी असलेल्या सर्वात छोट्या मुलीचे वय 11 वर्षे होते. जेव्हा ग्राहक पोहोचले तेव्हा त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेण्यात आले होते. तिने सांगितले, त्यांना एकापाठोपाठ बोलावले जायचे. आम्हाला त्यांच्यासमोर ठेवलेल्या खुर्चीवर बसावे लागायचे. खोलीत जाण्यापूर्वी आमचे बुरखे आणि ओढण्या काढून घेतले जायचे. माझी वेळ आली तेव्हा मला चार वेळा उभे करण्यात आले. त्यांनी मला चालायला लावले. त्यांना माझ्या शरिराचा अंदाज घ्यायचा असावा. बंदी महिलांना अत्यंत खासगी असे प्रश्न विचारले जात होते. अगदी मुलींना त्यांच्या मासिक पाळीची अखेरची तारीखही विचारली जात होती. खरेदी करण्यापूर्वी त्या गर्भवती तर नाहीत, याची खात्री केली जायची. दहशतवाद्यांच्या मते शरियतमध्ये प्रेग्नेंट गुलामांबरोबर सेक्स करण्यात मनाई आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photo's