आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पिस्तुल-कुर्‍हाड घेऊन मूव्ही थिएटरमध्ये घुसला हल्लेखोर, तीन जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशविलेत मूव्ही कॉम्पलेक्सबाहेर तैनात पोलिस अधिकारी - Divya Marathi
नॅशविलेत मूव्ही कॉम्पलेक्सबाहेर तैनात पोलिस अधिकारी
(फोटो: नॅशविलेत मूव्ही कॉम्पलेक्सबाहेर तैनात पोलिस अधिकारी)
न्यूयॉर्क- अमेरिकेतील टेनिसी राज्याची राजधानी नॅशविलेमध्ये एका हल्लेखोराने मूव्ही थिएटरवर केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने प्रेक्षकांवर पेपर स्प्रेने हल्ला केला. अखेर SWAT (Special Weapons And Tactics) टीमने हल्लेकोराला कंठस्नान घातले. हल्ला झाला तेव्हा थिएटरमध्ये एकून सात प्रेक्षक उपस्थित होते. हल्लेखोराकडून बनावट पिस्तुल आणि कुल्हाड जप्त करण्‍यात आल्याचे नॅशविले पोलिसांनी सांगितले.

फिंगरप्रिंट्सवरून पटली ओळख
कारमाइक हिकरी 8 मूव्ही कॉम्पलेक्समध्ये बुधवारी दुपारी दोन वाजता हल्ला झाला. 'मॅड मॅक्स: फ्यूरी रोड' ही मूव्ही दाखवला जात होता. हल्लेखोराने सर्जिकल मास्क परिधान केले होते. विंसेट डेविट मोंटानो (29) असे हल्लेखोरांचे नाव आहे. दोन महिलांवर पेपर स्प्रेने तर एकावर कुर्‍हाडीने हल्ला केला. थिएटरमधून बाहेर पडतानाचा स्वॅट टीमने त्याला ठार मारले. पोलिसांनी त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. फिंगरप्रिंट्सच्या आधारे हल्लेखोराची ओळख पटवण्यात आल्याचे नॅशविले फायर डिपार्टमेंटचे जनसंपर्क अधिकारी ब्राएन हॅस यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो...