आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooting At The Hotel Of An African Country Mali

माली (आफ्रिका): हॉटेलवर दहशतवादी हल्ला,170 ओलिस 20 भारतीयांची सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवाद्यांनी 170 जण ओलिस ठेवले होते. एएफपी - Divya Marathi
दहशतवाद्यांनी 170 जण ओलिस ठेवले होते. एएफपी
बमाको - आफ्रिकेतील देश मालीची राजधानी असलेल्या बमाको येथील रॅडिसन ब्ल्यू नावाच्या हॉटेलमध्ये आज (शुक्रवार) दहशतवादी हल्ला झाला. लष्‍करी मोहिमेत आतापर्यंत 80 लोकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्‍यात यश मिळाले आहे. यात 20 भारतीयांचाही समावेश आहे. हल्ल्यात आतापर्यंत 9 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हॉटेलमध्ये घुसलेल्या 10 दहशतवाद्यांनी 170 जणांना ओलिस ठेवले होते.
ओलिस ठेवण्‍यात आलेली सर्व भारतीय हे दुबईच्या एका कंपनीत काम करतात. ती सर्व रेडिसन ब्लू हॉटेलमध्‍ये थांबले आहेत, असे भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितले. मालीतील भारतीय राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार ओलिस ठेवण्‍यात आलेली सर्व 20 भारतीय सुरक्षित आहेत. मालीतील भारतीय दूतावासाचा क्रमांक 00223-20235420, 00223-20235421 आहे.
अद्याप हॉटेलच्या कॉरिडॉरमध्‍ये गोळीबार चालू असल्याचे संरक्षण सूत्राने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान बंदींपैकी ज्यांनी कुराणातील आयत म्हटले त्यांना दहशतवाद्यांनी सोडल्याची माहिती मिळाली आहे.
UPDATES
>लष्‍करी मोहिमेत आतापर्यंत 80 ओलिसांना सोडवण्‍यात यश मिळाले आहे.
> बंदींमध्ये 20 भारतीय नागरिक, एअर फ्रान्सचे 12 आणि टर्किश एअरलाइन्सचे 6 क्रू मेंबर्स
> दहशतवादी डिप्लोमॅटिक लायसन्सप्लेट असलेल्या गाडीतून आले होते. त्यामुळे त्यांना सहज प्रवेश मिळाला.
> चीनची न्यूज एजंसी शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार बंदींमध्ये 7 चिनी नागरिकांचाही समावेश आहे.
> पॅरिस हल्ल्यानंतर आठवडाभराच्या आत मुंबई हल्ल्याच्या धर्तीवर मोठा हल्ला
> पॅरिस हल्ल्यात म्युझिक कॉन्सर्टमध्ये केले होते नागरिकांना लक्ष्य
याच हॉटेलला का केले लक्ष्य...
- रेडीसन ब्ल्यू हॉटेल मालीच्या लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे.
- या हॉटेलमध्ये माली सरकारच्या मंत्र्यांसह, डिप्लोमॅट्स आणि फ्रेंच एअरपोर्सचे अधिकारी असतात.
- एअर फ्रान्सचे अधिकारी या हॉटेलमध्ये नियमितपणे थांबत असतात.
विशेष म्हणजे बंदींमध्ये आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा समावेश आहे. मृतांमध्ये फ्रान्स आणि बेल्जियमच्या नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आहे.
कुराणातील आयत ऐकवणाऱ्यांची सुटका
दहशतवाद्यांनी बंदी बनवलेल्या 170 जणांपैकी ज्यांनी कुराणातील आयती म्हटल्या त्यांना दहशतवाद्यांनी सोडून दिल्याचे वृत्त आहे. अशा एकूण 15 जणांना सोडल्याची माहिती आहे.
या बंदींमध्ये हॉटेलच्या 30 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्टसनुसार 190 रूम असलेल्या या हॉटेलला सुरक्षा रक्षकांनी चारही बाजुंनी घेराव घातला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर अल्लाह-ओ-अकबर, अल्लाह-ओ-अकबर ओरडत होते. यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या पाच कार्यकर्त्यांसह 13 जण ठार झाले होते. या हल्ल्यामागेही दहशतवाद्यांचा हात असल्याचे म्हटले जात होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये बमाकोमध्ये सुरक्षा संस्थांनी अनेक दहशतवादी हल्ले परतवून लावले आहे. हा हल्ला मॅकिना लिबरेशन फ्रंटने केला असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक मीडिया या संघटनेला 'न्यू बोको हरम' असे संबोधते.
पुढील स्लाइडवर पाहा बंदी असलेल्या एका चिनी पर्यटकाने पोस्ट केलेला VIDEO, इतर स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS