आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooting At US Planned Parenthood Clinic In Colorado Springs

अमेरिकेत गोळीबार: तीन ठार, 11 जखमी, हल्लेखोराचे आत्मसमर्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बल पाच तासांनंतर हल्लेखोर पोलिसांना शरण आला. - Divya Marathi
तब्बल पाच तासांनंतर हल्लेखोर पोलिसांना शरण आला.
कोलोराडो स्प्रिंग्स- अमेरिकेतील कोलोराडो स्प्रिंग्समधील एका प्लान्ड पॅरन्टहुड क्लिनिकमध्ये शनिवारी पहाटे एका हल्लेखोराने अंदाधूंद गोळीबार केला. यात एका पोलिसासह तीन जण ठार झाले आहेत. तसेच नऊ जण जखमी झाले आहेत. अखेर पाच तासांनंतर हल्लेखोरांनी स्वत: पोलिसांना शरण आला.
मिळालेली माहिती अशी की, कोलोराडो स्प्रिंग्समधील एका शॉपिंग सेंटरजवळ प्लान्ड पॅरन्टहुड क्लिनिकमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजेच्या सुमारास हल्लेखोर असॉल्ट रायफल घेवून क्लिनिकमध्ये घुसला व अंदाधूंद गोळीबार केला. क्लिनिकमधील एका व्यक्तीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांचे SWAT पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हल्लेखोराच्या दिशेने गोळीबार केला. अखेर तब्बल पाच तासांच्या चकमकीनंतर दुपारी साडेचार वाजता हल्लेखोर पोलिसांना शरण आला.

कोलोराडो स्प्रिंग्स जॉन सूदर्स यांनी सांगितले की, हल्लेखोराला अटक करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहे. अनेक एजन्सी या घटनेची चौकशी करत आहेत.

दरम्यान, प्लान्ड पॅरन्टहुड क्लिनिकमध्ये भ्रूणवर रिसर्च केले जाते. तसेच अबॉर्शन्सही होतात. तसेच हल्ला झाला तेव्हा क्लिनिकमध्ये 200 पेक्षा जास्त लोक होते. होमलॅंड सिक्युरिटी अॅडव्हायझर लीसा मोनाको यांनी या घटनेची माहिती राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कळवली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...