आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील चर्च गोळीबार, संशयित आरोपी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्ल्सटन- अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना प्रांतात चार्ल्सटनमधील ऐतिहासिक अाफ्रिकी-अमेरिकी चर्चमध्ये गुरुवारी झालेल्या हल्ल्यांतील संशयित आरोपीला तेरा तासांनी पोलिसांनी अटक केली. डिलेन रूफनामक या व्यक्तीवर वंशभेदासह गुन्हेगारीसंबंधी गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्री प्रार्थनेदरम्यान झालेल्या हल्ल्यात पादरी आणि सिनेटर क्लिमेंटा पिंकनीसह ९ लोक ठार झाले होते. प्रत्यक्षदर्शीनुसार, हल्लेखोराने पाच वेळा बंदूक लोड करून गोळीबार केला होता. तो ठरवून लोकांना लक्ष्य करत होता. अटक करण्यात आलेला आरोपी श्वेतवर्णीय असून वांशिक वादातूनच त्याने या चर्चवर गोळीबार केल्याचे मानले जाते. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...