आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेयाच्या बर्गरवर आेबामा यांचा ताव: श्रेया पटेलची रेसिपी अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - एकदा चाखल्याबरोबर त्याची चव जिभेवर रुंजी घालते, हीच तर खरी भारतीय तडक्याची कमाल म्हटली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनादेखील भारतीय रेसिपीचा स्वाद मनापासून भावला.
अलीकडेच अमेरिकेत राहणाऱ्या एका नऊवर्षीय भारतीय मुलीने आेबामा दांपत्याला कोशिंबिरीसोबत स्वत:च्या हाताने तयार केलेला गरम मसाला बर्गर खाऊ घातला. तेव्हा राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी मिशेल दोघेही बोटे चाटत राहिले. श्रेया पटेल असे या मुलीचे नाव. आेबामा दांपत्याच्या खवय्येगिरीसाठी श्रेयाला व्हाइट हाऊसमध्ये रेड कार्पेटसारखी वागणूक देण्यात आली. अमेरिकेच्या इलिनॉयमधून आलेली श्रेया एका कुक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आली होती. स्पर्धेत देशभरातून आलेले ५५ छोटे कुक्सही होते. त्या सर्वांना चौथ्या किड्स स्टेट डिनरमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले होते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आरोग्यदायी आणि लज्जतदार रेसिपी तयार करण्याची अट होती.

आेबामा आणि मिशेल यांना श्रेयाने तयार केलेली रेसिपी मनापासून आवडली. त्यानंतर तिला इलिनॉय राज्यातील विजेती म्हणून जाहीर करण्यात आले. त्याबरोबरच श्रेयाला आेबामा यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये लंच करण्यासाठीदेखील निमंत्रण मिळाले. किड्स स्टेट डिनर ८ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यात १ हजाराहून अधिक रेसिपीज आयोजित करण्यात आल्या होत्या. या शानदार विजयानंतर श्रेयाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी लहानपणापासून माझी आई आणि आजीला अनेकानेक रेसिपी बनवताना पाहिले होते. त्यामुळे हे सोपे झाले.
बातम्या आणखी आहेत...