आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजराती महिलेला US मध्‍ये 20 वर्षांची शिक्षा, पतीला जिवंत जाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक्सास - लग्‍नाच्‍या सातव्‍याच दिवशी आपल्‍या पतीला जिवंत जाळल्‍या प्रकरणी अमेरिकेतील टेक्सास न्‍यायालयाने मूळ गुजराती असलेल्‍या श्रेया पटेल (27) हिला 20 वर्षांची शिक्षा ठोठावली.
हॉट मसाजचे निमित्‍त करून बाथरूममध्‍ये बोलावले होते...
> 10 एप्रिल 2012 रोजी श्रेया हिचे विमल यांच्‍यासोबत टेक्सासमध्‍ये अरेंज्ड मॅरिज झाले.
> 17 एप्रिल 2012 रोजी श्रेया अंघोळीसाठी बाथरुममध्‍ये गेली. तिने पती विमल यांना हॉट
मसाजचे निमित्‍त करून बोलावून घेतले....
> विमल बॉथटबमध्‍ये गेल्‍यानंतर श्रेयाने त्‍यांच्‍यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.
> दरम्‍यान, शेजाऱ्याला बाथरुममधून धूर येताना दिसला. त्‍याने तत्‍काळ पोलिसांना माहिती दिली.
> पोलिस घटनास्‍थळी आले. यावेळी विमल हे 80 टक्‍के भाजले होते.

श्रेयाने केली दिशाभूल
> पोलिसांनी विमल यांना रुग्‍णालयात भरती केले. ते चार महिने कोमात होते. नंतर त्‍यांचा मृत्‍यू झाला.
> विमल यांनी आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला, अशी बतावणी करून श्रेयाने पोलिसांची दिशाभूल केली.
> पण, श्रेयानेच त्‍यांची हत्‍त्‍या केल्‍याचे पोलिस तपासात उघड झाले.
का केला खून ?
> सरकारी वकिलाने सांगितले, श्रेया लंडन आणि दुबईमध्‍ये वाढली. तिला हाई प्रोफाइल लाइफ जगण्‍याची सवय लागली होती.
> दारू, लेट नाइट पार्टी असेच आयुष्‍य तिला आवडत होते.
> तिच्‍या या सवयी विमल यांना खटकल्‍या. त्‍यामुळेच त्‍यांच्‍यापासून सुटका करण्‍यासाठी तिने त्‍यांचा खून केला.
> श्रेयाचा हा गुन्‍हा गंभीर असून, तिला जन्‍मठेप द्यावी, अशी मागणीही सरकारी वकिलाने न्‍यायालयाकडे केली होती.
> दरम्‍यान, श्रेयाच्‍या वकिलाने तिला भारतात पाठवण्‍याची मागणी केली होती.
> न्‍यायालयाने तिला 20 वर्षांची शिक्षा ठोठावली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, श्रेयाचे फोटोज...