आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या उपचारासाठी ८३ व्या वर्षी पॅराग्लायडिंग करून जमवले १६००पाउंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिव्हरपूल - आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदारासाठी व त्याच्यावरील प्रेमापोटी मनुष्य काहीही धाडस करायला तयार होतो, असे म्हणतात. इंग्लंडमधील ८३ वर्षी जॉन बॅराट यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. या वयातही ते सहा हजार फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करायला जरादेखील कचरत नाहीत. त्यांची ६१ वर्षीय पत्नी अल्झायमरने पीडित आहे. तिच्या उपचारासाठी ते आकाशात चित्तथरारक कवायती करतात. ते स्वत: कॅन्सरपीडित आहेत, हे विशेष! ही जोडी स्थानिक लोकांत "रिअल लाइफ नोटबुक' नावाने ओळखले जातात.

जॉन पत्नीला भेटण्यासाठी दररोज रुग्णालयात जातात. आठ ते नऊ तास ते पत्नीसमवेत घालवतात. त्यांना पत्नीच्या उपचारासाठी ५०० पाउंड जमा करायचे होते. कुणी तरी सल्ला िदला म्हणून मग ते पॅराग्लायडिंग करण्यासाठीही तयार झाले. जेव्हा या वयात त्यांनी इतक्या उंचीवर पॅराग्लायडिंग केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली व त्यामागचे कारण लोकांना समजले तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे १६०० पाउंड रक्कम झाली.

जॉन यांनी सांगितले, ते त्यांच्या शहरातील पहिले ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांनी या वयात असा धाडसी क्रीडाप्रकार केला असेल. परंतु हे करताना मला जरादेखील भीती वाटली नाही. जॉन १९५३ मध्ये मार्गरेटला भेटले होते. वर्षभरानंतर त्यांनी िववाह केला. तिला २००६ मध्ये तिला या आजाराने घेरले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मी अर्धा तास पॅराग्लायडिंग केली. मला वाटले की, हे करायला हवे व ते मी करून दाखवले. मी माझ्या इन्स्ट्रक्टरसोबत गेलो होतो समुद्र किनारा, डोंगररांगांवरून नजर फिरवली व स्वत:ला तयार केले.

रिअल नोटबुक म्हणून जोडी प्रसिद्ध
रुग्णालयातील स्टाफ त्यांना फिल्मी नोटबुकची जोडी म्हणून ओळखतो. जॉन म्हणतात की, मी व माझी पत्नी रिअल लाइफ नोटबुकच आहोत. मी आजही तिच्याशी जुन्या आठवणी सांगून संवाद साधतो. आपण कसे भेटलो होतो, तिला काय काय आवडते. अशा हजारो गोष्टींवर मी गप्पा मारतो. ६१ वर्षे आम्ही सोबत आहोत, ती आता मला नीटपणे पाहू शकत नाही ओळखत नाही याचे वाईट वाटते. पण तिच्यासाठी माझ्या मनातले प्रेम जराही कमी झालेले नाही.
मी आजदेखील तिच्यासाठी काहीही करू शकतो.