आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddartha Dhar The Masked Isis Militant And New Jihadi John

ISIS मध्‍ये भारतीय वंशाचा दहशतवादी बनलाय नवा जिहादी जॉन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका दिवसापूर्वी जारी करण्‍यात आलेल्या व्हिडिओत सिध्‍दार्थ धर नवा जिहादी जॉन असल्याचे सांगितले आहे. - Divya Marathi
एका दिवसापूर्वी जारी करण्‍यात आलेल्या व्हिडिओत सिध्‍दार्थ धर नवा जिहादी जॉन असल्याचे सांगितले आहे.
लंडन : इस्लामिक स्टेटच्या(आयएसआयएस) नव्या व्हिडिओत भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक सिध्‍दार्थ धरही सामील झाला असल्याचे दिसत आहे. हा दावा ब्रिटनच्या सुरक्षा एजन्सींनी केला आहे. सिध्‍दार्थने 10 वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारुन अबू रुमायसाह असे नवे नाव धारण केले.
मास्क घातलेला व्यक्ती सिध्‍दार्थ ऊर्फ अबू रुमायसाह...
- दोन दिवसांपूर्वी आयएसने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाच लोकांवर गोळ्या झाडल्याचे व्हिडिओ जारी केला होता.
- व्हिडिओत मास्क घातलेला एक दहशतवादी दिसत आहे. सुरक्षा संस्थाना तो व्यक्ती सिध्‍दार्थ धरच असल्याचे सांगितले आहे.
- 2014 मध्‍ये सिध्‍दार्थची मुलाखत घेणारा मुजतबा अली म्हणाला, की व्हिडिओतला नवा जिहादी जॉन अबू रुमायसाह अर्थात सिध्‍दार्थसारखी दिसत आहे.

जामीनावर सुटल्यानंतर ब्रिटन सोडले...
- बंदी घातलेली दहशतवदी संघटना अल मुहाजिरुशी संबंध ठेवल्याने त्याला आठ लोकांसळ 2014 मध्‍ये अटक करण्‍यात आली होती. नंतर जामीनावर त्याची सुटका झाली.
- यानंतर सिध्‍दार्थ पत्नी आणि मुलांसह सीरियात पळून गेला. येथे तो आयएसमध्‍ये सामील झाला.
- नोव्हेंबर 2015 मध्‍ये त्यांने आपल्या मुलांसह ट्विटरवर फोटो शेअर केला होता. त्यात लिहिले होते, की माझ्या मुलांनी इस्लामिक स्टेटमध्‍ये जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे.
ब्रिटनमध्‍ये शरिया कायदा आणू इच्छितो
- तो ब्रिटनचा फुटीरवादी नेता मौलवी अंजम चौधरीच्या प्रचारसभेत कित्येकदा दिसला आहे.
- सीरियात जाण्‍यापूर्वी त्याने इस्लामिक विचारसरणीवर टीव्ही अनेकदा मुलाखत दिली होती.
- तो म्हणाला होता, की एक दिवस ब्रिटनमध्‍येही शरियत कायदे लागू होतील.
बहिणीला विश्‍वास नाही...
लंडनमध्‍ये राहणारी सिध्‍दार्थची बहीण कोनिका धर म्हणाली, की मला विश्‍वास बसत नाही की तो माझा भाऊ आहे. जर त्याने असे केले तर मला त्याबाबत मोठा धक्का बसला आहे. त्याने असे केल्याचे सिध्‍द झाले तर मी तो परत आल्यास त्याची गोळ्या झाडून हत्या करेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा नव्या जिहादी जॉनची छायाचित्रे...