आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddhartha Wrote A Travel Guide On ISIS In A Bid To Recruit More Muslims

भारतीय वंशाचा सिद्धार्थ झाला नवा जिहादी जॉन? IS भरतीसाठी लिहिले ट्रॅव्हल गाइड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ धरचा हा फोटो तो ब्रिटनमध्ये राहात असतानाचा आहे. - Divya Marathi
सिद्धार्थ धरचा हा फोटो तो ब्रिटनमध्ये राहात असतानाचा आहे.
लंडन - भारतीय वंशाचा ब्रिटीश नागरिक सिद्धार्थ धर उर्फ अबु रुमायसाह याने कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयएस जॉइन केली असून, त्यांच्या ताब्यातील भागावर त्याने ट्रॅव्हल गाइड लिहिले आहे. त्याने दावा केला आहे की आयएसच्या परिसरात एखाद्या रिसॉर्टसारखे वातावरण असते. येथे किटकॅट, स्निकर्स सारखे चॉकलेट आणि बेस्ट इटालियन कॉफी देखील मिळते.

सिद्धार्थला म्हटले जाते जिहादी जॉन
गेल्या वर्षी ब्रिटनहून पत्नी आयशा आणि पाच मुलांसह सीरियात पोहोचलेला सिद्धार्थला ब्रिटीश मीडिया आणि गुप्तचर संस्था नवा जिहादी जॉन म्हणत आहे.
- दोन दिवसांपूर्वी आयएसने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाच जणांची हत्या केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात दिसणारी व्यक्ती सिद्धार्थ असल्याचे म्हटले जात आहे.

बहिण म्हणाली, मी त्याचा जीव घेईल..
- ब्रिटनमध्ये राहात असलेली सिद्धार्थची बहिण कोनिका धर भावाला नवा जिहादी म्हटले जात असल्याबद्दल म्हणाली, 'जर खरोखरच तो नवा जिहादी जॉन असेल तरी मी त्याचा जीव घेईल.'
कोनिकाने सांगितले, की सिद्धार्थ पहिले सामान्य ब्रिटीश मुलांप्रमाणे राहात होता. त्याचे मित्र त्याल 'सिद' म्हणत होते. त्याला फुटबॉल, मुव्हिज, वाइन आणि मुलींसोबत डेटिंग करायला आवडत होते. त्याला निर्वाण आणि लिंकिन पार्क सारखे म्यूझिक बँड्स आवडायचे.

कोण आहे सिद्धार्थ धर उर्फ अबु रुमायसाह
- 32 वर्षांचा सिद्धार्थ धर याने 10 वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्विकारला होता. 16 व्या वर्षी वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने शिक्षण सोडून जॉब करायला सुरुवात केली.
- ब्रिटीश वेबसाइट 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, 'अबु रुमायसाह एवढा कट्टर झाला होता की आई इस्लाम स्विकारत नाही म्हणून तो तिचाही राग करु लागला होता.'
- त्याने ब्रिटनच्याच आयशासोबत लग्न केले. वृत्तानुसार, लग्नानंतरच अबु अधिकाधिक कट्टर होत गेला. यात आयशाचा हात होता.
- गेल्या वर्षी ब्रिटीश पोलिसांनी त्याला अटक केली होती. नंतर त्याला जामीनावर सोडण्यात आले आणि तो सिरियात पोहोचला.
- सूत्रांच्या माहितीनुसार, ब्रिटीश पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला होता. त्यामुळे त्याने पॅरिसपर्यंत बसने प्रवास केला आणि तेथून तो सिरियात गेला.

काय आहे ट्रॅव्हल गाइडमध्ये
- धरने 'ए ब्रीफ गाइड टू द इस्लामिक स्टेट्स 2015' लिहिले आहे. यात मुस्लिमांना आयएसशी जोडण्याचा मुख्य उद्देश आहे.
- 46 पानांच्या पुस्तकात धरने म्हटले आहे, की आयएसचा परिसर एखाद्या रिसॉर्ट सारखा आहे. येथे किटकॅट, स्निकर्स सारखे प्रसिद्ध चॉकलेट आणि इटालियन कॉफी मिळते.
- मुस्लिमांना जोडण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या पुस्तकात आयएसच्या भागातील वातावरण, फूड, ट्रान्सपोर्ट आणि शिक्षण, तंत्रज्ञान याबद्दल सांगितले आहे.
- येथील कोणत्याही वर्गात समलैंगिकता, संगित, धर्म आणि पंथाबद्दल शिवकवले जात नाही. तर, मुलांना फक्त इस्लामचे शिक्षण दिले जाते.
- त्याने लिहिले आहे, 'जर तुम्हाला न्यूयॉर्क आणि लंडन कॉस्मोपॉलिटन सिटी वाटत असेल, तर तुम्ही येथे येईपर्यंत तसाच विचार करत राहा.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा सिद्धार्थ उर्फ अबु रुमायसाहचे फोटोज्..