आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मध्ये शीख तरुणाला क्लासमेटने केली मारहाण, कुटुंबीय म्हणाले-हा हेट क्राइमचा प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या वॉशिंगटनमध्ये 14 वर्षांच्या एका शीख मुलाला त्याच्या वर्गातील एका मुलाने मारहाण केली. या मुलाने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शीख मुलाला खाली पाडले. पीडित तरुणाच्या वडिलांनी दावा केला की, त्यांच्या मुलाला टार्गेट करण्यामागचे कारण म्हणजे, तो भारतीय वंशाचा आहे. हा हेट क्राइमचा प्रकार असल्याचेही ते म्हणाले. 

मारहाणीचा व्हिडिओ तयार करून केला पोस्ट.. 
- न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार द न्यू ट्रिब्यूनने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ही घटना गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनच्या केंट्रिज हायस्कूलमध्ये घडली. घटनेच्यावेळी पीडित तरुणाने पगडी परिधान केली होती. या मुलाला मारहाण होत असताना काही मित्रांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हिडिओ स्नॅपचॅटवर पोस्ट केला. 
- व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, शीख मुलाच्या मागून आलेल्या एका मुलाने अचानक त्याला मारहाण सुरू केली. त्यामुळे पीडित मुलगा जमिनीवनर पडला. घटनेच्या दरम्यान शीख मुलगा डोके वाचवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

शाळा म्हणाली हेट क्राइम नाही.. 
- रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, केंट्रिज हायस्कूल मॅनेजमेंटने हा प्रकार हेट क्राइम असल्याचे नाकारले आहे. 
- हा धार्मिक किंवा वर्णद्वेशी हल्ला नसून, वर्गातील विद्यार्थ्यांचे भांडण होते. 
- पीडित मुलाच्या वडिलांना म्हटले की, मुलाबाबत त्यांना भिती वाटते. माझ्या मुलाबरोबर असे झाले याचे वाईट वाटते. पण आरोपीला कधी भेटलो नाही, किंवा त्याचे नावही माहिती नाही. पण माझ्याच काय कोणाच्याही मुलाबरोबर असे घडू नये असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...