आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sikh Comedian Forced To Remove Turban At US Airport

अमेरिकी विमानतळावर शीख कलाकाराची पगडी उतरवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनफ्रान्सिस्को - अमेरिकेत सुरक्षा तपासणीदरम्यान एका भारतीय - कॅनडियन वंशाच्या शीख विनोदी कलाकाराची पगडी जबरदस्ती उतरवण्यात आली. काही दिवसांपूर्वीच एका अमेरिकी शीख अभिनेत्याने पगडी उतरवण्यास नकार दिल्याने त्याला मेक्सिकोत विमान प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला होता.

सोशल मीडियावर जसरेन नावाने प्रसिद्ध असलेल्या जसमित सिंग या विनोदी कलाकाराने या घटनेबाबत ट्विट केले आहे. अतिरिक्त सुरक्षा तपासणीत मला माझी पगडी उतरवण्यास भाग पाडण्यात आले. अन्यथा मला विमान प्रवास करता आला नसता. सर्व तपासण्यात पगडी हे कापड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मी पगडी बांधण्यासाठी आरसा मागितला. तेव्हा मला आरसा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मला आराम कक्षापर्यंत बिनापगडीच जावे लागले, असे जसमितने ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी ९ फेब्रुवारी रोजी केवळ पगडी काढण्यास नकार दिला म्हणून शीख अमेरिकी अभिनेता वारिस अहलुवालियाला मेक्सिको सिटीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानातून उतरवण्यात आले होते. या घटनेची फॅशन जगताने तीव्र टीका केली होती. नंतर मेक्सिकोच्या विमान कंपनीने त्यांची माफी मागितली होती.