आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या देशात निघून जा, शीख बांधवाला म्हणाला हल्लेखोर; सुषमांनी केली जखमीच्या वडिलांशी चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांवर हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. एका व्यापाऱ्याची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका शीख बांधवावर गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. 39 वर्षीय भारतीय शीख बांधव दीप राय यांना त्यांच्या घराच्या बाहेर गोळी मारण्यात आली. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. गोळी मारल्यानंतर हल्लेखोर तुझ्या देशात निघून जा, असे म्हणून फरार जाला. गेल्या नऊ दिवसांत भारतीय व्यक्तीवर हल्ल्याचा हा तिसरा प्रकार आहे. दरम्यान सुषमा स्वराज यांनी दीप यांच्या वडिलांशी चर्चा केली आहे. 
 
अमेरिकेतील शीख समुदायाचे सर्वात मोठे नेते गुरींदर सिंग खालसा म्हणाले की या हल्ल्यासाठी भारतीयदेखिल जबाबदार आहेत. US मध्ये येणाऱ्या भारतीयांनी अमेरिकन नागरिकांबरोबर अधिक जवळीकता वाढवली तर असे प्रकार होणार नाहीत, असे ते म्हणाले. आमचे प्रतिनिधी अविनाश श्रीवास्तव यांनी याबाबत गुरींदर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी भारतीयांवरील हल्ल्याची 4 प्रमुख कारणे सांगितली. 
 
1. भारतीय अमेरिकेत आल्यानंतर निवडक लोकांबरोबरच ओळख वाढवतात. काही घ्यायचे असेल तरी इंडियन स्टोअर्समध्येच जातात, अमेरिकन नागरिकांशी जवळीकता वाढवत नाहीत. 
2. हल्लायेच दुसरे कारण पोशाख असे सांगितले. भारतीय पोशाख परिधान करून कार्यक्रमात गेल्यास कोणीतरी बाहेरून येऊन त्यांची संस्कृती आपल्यावर लादत आहे, असे त्यांना वाटते. 
3. गुरूींदर म्हणाले, अमेरिकन्सबरोबर मैत्री वाढवायला हवी. सर्वांसोबत बोलायला हवे. बोलतानाही इंग्रजीत बोलायला हवे. पण भारतीय तसे करत नाहीत. 
4. अमेरिकेत सुमारे 33 लाख भारतीय आहेत. पण पंजाबी, गुजराती, दक्षिण भारतीय असे त्यांचे गट आहेत. ते कधी एकत्र येत नाहीत. 
 
6 फुटांचा हल्लेखोर, चेहरा होता झाकलेला 
- सिएटल टाइम्सच्या रिपोर्टनुसार हे प्रकरण शुक्रवारचे आहे. 
- वॉशिंग्टनच्या केंटमध्ये राहणारे दी घराबाहेर काहीतरी काम करत होते, त्याचवेळी हा हल्ला झाला. 
- पीडितांनी सांगितले की, हल्लेखोर म्हणाला तुमच्या देशात निघून जा. त्यानंतर त्याने गोळी झाडली आणि ती माझ्या हातावर लागली. 
- पीडिताच्या मते, हल्लेखोर 6 फूट उंच गोरा व्यक्ती होता. मास्कद्वारे त्याचा अर्धा चेहरा झाकलेला होता. 
- केंट पोलिस प्रमुख केन थॉमस यांच्या मते, शीख बांधव गंभीर जखमी झालेले नाही. पण हल्ला गंभीर होता आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

सुषमांनी केली दीप यांच्या वडिलांशी चर्चा 
- सुषमा स्वराज यांनी दीप यांचे वडील सरदार हरपाल सिंह यांच्याशी चर्चा केली आणि घटनेबाबत दुःख व्यक्त केले. 
- सुषमा यांनी ट्वीट केले की, दीप यांच्या वडिलांनी सांगितले त्यांच्या मुलाच्या हातावर गोळी लागली होती. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. 
- त्याआधी भारतातील अमेरिकेचे अॅम्बेसेडर मेरीके कार्लसन यांनीही वॉशिंग्टनमधील याघटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. 
 
गेल्या काही महिन्यांत शीख बांधवांना लक्ष्य करण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांत वाढ झाली असल्याचे शीख समाजातील नेते जसमित सिंह यांनी सांगितले. इतर अल्पसंख्याक समाजांनाही अशा प्रकारांना तोंड द्यावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, गुरुवारी झाली होती भारतीय वंशाच्या व्यापाऱ्याची हत्या...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...