आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये पंजाबच्या मंत्र्यांवर फेकले दगड, बूट; तीन तासांनी पोहोचले पोलिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पंजाबचे एनआरआय मंत्री तोता सिंह. - Divya Marathi
फाइल फोटो : पंजाबचे एनआरआय मंत्री तोता सिंह.
न्यूयॉर्क - पंजाबचे एनआरआय मंत्री तोता सिंह आणि त्यांच्या ताफ्यावर अमेरिकेत शेकडो शिखांनी दगड आणि बूट फेकले. त्यांना विरोध करणाऱ्या शीख समुदायाच्या लोकांनी ही दगडफेक केली. गोंधळ वाढल्याने अखेर मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. त्यावेळी शेकडो शीख बांधवांनी त्यांना विरोध दर्शवत त्यांना घेराव घातला.

दोन शीख मुलांना अटक
या प्रकरणी दोन शीख मुलांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, बेकायदेशीररित्या एकत्र येऊन गोंधळ घालणे या आरोपात त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘शीख फॉर जस्टीस’ (एसएफजे) च्या नेतृत्वात नॉर्थ अमेरिकन शीख ग्रुप ने आंदोलन केले होते. यात में एसएफजे, शीख यूथ अमेरिका, शिरोमणी अकाली दल (अमृतसर) आणि अमेरिका गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा समावेश होता.

हल्ल्याचे कारण
एसएफजे 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलींचा विरोध करण्यासाठी भारतीय नेत्यांच्या विरोधात आंदोलन करत असते. त्यांचे कायदेशीर सल्लागार गुरपतवंत सिंह पनून म्हणाले की, ‘'पंजाबमध्ये 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला दहशतवादविरोधी अभियानादरम्यान हजारों निर्दोष शीख बांधवांची हत्या करण्यात आली होती. त्या अभियानात सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात शिरोमणी अकाली दलच्या बादल सरकारने आतापर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. उत्तर अमेरिकेचा शीख समूह त्याचाच विरोध करत आहे.
बातम्या आणखी आहेत...