आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी-ट्रम्प यांच्यात सारखेपणा असूनही दोघांच्या धोरणांत मोठा फरक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांत मोठी उत्सुकता दिसून येते आहे. ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट धोरण, व्हिसा आणि पॅरिस करारावरून मतभेद असूनही दोन्ही देशांचे संबंध ऐतिहासिकरीत्या वाटचाल करतील, असे त्यांना वाटते. या छोटेखानी दौऱ्यात मोदी ट्रम्प यांचे मत बदलू तर शकत नाहीत, परंतु भारताकडे एक संधी म्हणून पाहावे, हे तरी नक्कीच सांगू शकतील. या वृत्तपत्राने म्हटले की, ट्रम्प यांच्या एच-१ बी व्हिसा धोरणामुळे भारतीयांच्या संधीत घट झाली आहे.  

पॅरिसच्या हवामान कराराचा फायदा भारत घेत आहे, या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी माघार घेतली. त्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे व्हाइट हाऊसकडूनही या भेटीला काही खास बनवण्यात कसर ठेवू इच्छित नाही. याबरोबरच या वृत्तपत्राने म्हटले आहे की, काही बाबतीत ट्रम्प आणि मोदी यांच्यात समानता आहे. दोघेही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ इच्छितात.  राष्ट्रवादी दृष्टिकोन ठेवून दोघांनीही आपआपल्या विरोधकांना मात दिली आहे. याशिवाय सोशल मीडियावर या दोन नेत्यांनाच सर्वाधिक फालाेअर्स आहेत. ट्रम्प यांच्या इमिग्रेशन पाॅलिसीवर चिंता व्यक्त करताना फेडरेशन आॅफ  इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष श्रृजल पारेख यांनी सांगितले, मोदी ट्रम्प यांच्यासमोर या अडचणी मांडतील. मी सुद्धा एक प्रवासी असून या देशाला प्रवाशांनीच घडवले आहे हे पटवून देतील, असे माझे मत असल्याचे पारेख म्हणाले.

गेल्या वेळी यूएस काँग्रेसमध्ये मी म्हटले होते, भारत आणि अमेरिका दोघांनीही जुन्या अडचणीवर मात करून नव्या नात्यांना उभारी दिली आहे. एक वर्षाने मी पुन्हा आलो आहे. दोन्ही देशात आधीपेक्षा जास्त क्षमतेने काम करण्याचे आश्वासन देत आहे.
- नरेंद्र मोदी

मोदींचा वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये लेख
मोदींनी वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये “फॉर द यूएस अँड इंडिया, ए कन्व्हर्जन्स ऑफ इंटरेस्ट्स अँड व्हॅल्यूज’ शीर्षकाखाली एक लेख लिहिला आहे. 

व्यवसाय: दोन्ही देश एकमेकांच्या अर्थव्यवस्थेला गती देत आहेत 
आमची भागीदारी यश आणि विकासाचे व्हिजन गाइड आहे. १५ बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीतून भारतीय कंपन्या अमेरिकेतील उत्पादन व सेवा क्षेत्रातील मूल्यांना जोडत आहेत. अमेरिकी कंपन्यांनी भारतात २० बिलियन डाॅलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली.

दहशतवाद: भारताला दहशतवादाशी लढण्याचा ४० वर्षांचा अनुभव 
संरक्षण क्षेत्राचा दोन्ही देशांना फायदाच होणार आहे. भारत आणि अमेरिका दोघेही समाज अणि जगाला दहशतवाद, कट्टरपंथीयापासून सुरक्षित ठेवू इच्छितात. भारताकडे दहशतवादांशी लढण्याचा चार दशकांचा अनुभव आहे. 

प्रवासी भारतीय: ३० लाख भारतीयांचे अमेरिकी समाजासाठी मोठे योगदान
अमेरिकेत राहणारे ३० लाख भारतीयांनी दोन्ही देशाना जोडण्यास मोठी मदत केली आहे. त्यांनी आमच्या समाजात विशेष योगदान दिले आहे. गेल्या दोन दशकापासून आमच्यात परस्पर सुरक्षा व विकासावरुन दोन्ही देशामध्ये यशस्वी प्रवास झाला आहे.

जीएसटी: अमेरिकी कंपन्यांसाठी भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी  
अमेरिकी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रण देताना मोदींनी सांगितले, भारतात १ जुलैपासून जीएसटी लागू होईल. १०० स्मार्ट शहराच्या योजनेतंर्गत बंदराचा विकास, विमानतळ, रस्ते व रेल्वे वाहतूक विकसित करण्यात येईल. भारत-अमेरिका भागीदारीचा हा परिणाम आहे.
बातम्या आणखी आहेत...