आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असल्याने कित्येकदा अपमानास्पद वागणूक, पॉप क्वीन मॅडोनाने मांडली व्यथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - स्त्री-पुरुष समानतेचा कितीही नारा दिला जात असला तरी पुरुषी मानसिकतेचा फटका सामान्य महिलांना बसतो. त्याला सेलिब्रिटी महिलादेखील अपवाद नाहीत. पॉप क्वीन मॅडोनाने याबाबतची व्यथा मांडली आहे. गुंडगिरी, स्त्रीद्वेष, शिवीगाळ अशा गोष्टींना मला अनेकदा सामोरे जावे लागले आहे, असे मॅडोनाने म्हटले आहे.

संगीत क्षेत्रातील एका पुरस्कार समारंभात मॅडोना प्रमुख पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. त्याप्रसंगी मॅडोनाने स्त्री म्हणून आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांना उपस्थितांसमोर खुलेपणाने मांडले. तिने व्यक्त केलेल्या भावना तिच्याच शब्दांत-

मी तुमच्यासमोर पायपुसणे म्हणून उभी आहे. म्हणजे मला म्हणायचे की एक महिला एंटरटेनर म्हणून उभी आहे. कारकीर्दीची ३४ वर्षे पूर्ण झाली. माझ्यातील क्षमतेसह मला स्वीकारले त्याबद्दल मनापासून आभारी आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेकदा पुरुषांची दादागिरी, स्त्रीद्वेष आणि शिवीगाळ अशा गोष्टींचा कित्येकदा सामना केला. तुम्ही मुलगी असाल तर एक खेळ खेळावाच लागतो.
तुम्ही सुंदर, सेक्सी दिसले पाहिजे. मात्र, अधिकची हुशारी चालणार नाही. तुम्हाला तुमची मतही नसली पाहिजेत. कारण ते आऊट ऑफ लाइन ठरते. पुरुष तुम्हाला वस्तू म्हणून पाहत असतील तर त्यांना तसे करण्याची परवानगी द्या...आणि एक गोष्ट करू नका. मी पुन्हा सांगते. तुमच्या लैंगिक कल्पना, इच्छा जगासोबत मुळीच शेअर करू नका. पुरुषांना काय हवे आहे तेच करा. वयाचे तर बोलूच नका. कारण त्याबद्दल बोलणे म्हणजे पापच बरं का. असो. पण महिलांनी परस्परांना बळ देण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. हाच पुरुषप्रधान मानसिकतेतून निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांवरील उपाय आहे, असे मला वाटते.’
अनेक आयकॉन गेले
सभोवताली आता आयकॉन दिसत नाहीत. मायकल जॅक्सन गेला. ट्युपॅक नाही. प्रिन्सही गेला. व्हिटनी गेली. अॅमी वाइनहाऊस, डेव्हिड बॉवी आपल्यातून निघून गेले. मी तुमच्यात अजूनही आहे. त्यामागे मला मिळणारे आशीर्वाद असावेत. खरे तर मी खंबीर बनण्यामागील श्रेय निंदा करणाऱ्यांना द्यावे लागेल. त्यांचे मी आभार मानते. त्यांच्यामुळे मला संघर्ष करता आला. बळकट आणि अधिक स्थिर होता आले.
बातम्या आणखी आहेत...