आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूरचा सरकारी गाडा इंटरनेटशिवाय, सर्वाधिक वापर असलेल्या देशाचा जगाशी संपर्क तुटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - इंटरनेटशिवाय सरकारी कारभार करणे आजच्या घडीला अशक्यच; परंतु जगातील सर्वाधिक इंटरनेट वापर असलेल्या सिंगापूरच्या सरकारी यंत्रणेला सध्या इंटरनेटशिवाय कारभार हाकावा लागणार आहे.

सुरक्षेच्या कारणावरून सरकारने हा निर्णय घेतला आहे. इंटरनेट नसल्याचा परिणाम सरकारच्या कारभारावर होणार नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. इन्फोकॉम डेव्हलपमेंट अथॉरिटीने (आयडीए) हा दावा केला आहे, परंतु स्थानिक मीडियाच्या म्हणण्यानुसार, सुमारे १ लाख संगणकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येईल. इंटरनेटचा जगाशी थेट संपर्क येणार नसला तरी सरकारच्या अंतर्गत पातळीवर मात्र इंटरनेट सुरू राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अॅक्सेसची सोय उपलब्ध करून दिली जाईल. ही व्यवस्था एक वर्षासाठी करण्यात आल्याचे आयडीएकडून सांगण्यात आले. सरकारी कर्मचारी आपल्या खासगी टॅब्लेट व स्मार्टफोनवरून कामात सक्रिय होऊ शकत होते. आता हे शक्य होणार नाही. कामात दिरंगाईदेखील होऊ शकते. दरम्यान, सिंगापूर सरकारने २०१४ मध्येच माहिती-तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना आखल्या जाणार असल्याचे जाहीर केले होते.

पुढे वाचा...
फटका कसा बसणार?
सायबर हल्ल्याची चिंता
बातम्या आणखी आहेत...