आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवुडचे जेम्स बॉन्ड रॉजर मूर यांचे कर्करोगामुळे निधन; 007 वेळा साकारली आयकॉनिक भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - हॉलिवुडच्या सर्वात लोकप्रीय चित्रपट मालिकांपैकी एक जेम्स बॉन्डचे नायक आणि ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर (89) यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांनी ट्वीट करून मंगळवारी यासंदर्भातील माहिती जाहीर केली. लिव्ह अॅन्ड लेट डाय आणि अ व्यू टु किल या जेम्स बॉन्ड मालिकांसह तब्बल 7 चित्रपटांमध्ये त्यांनी आयकॉनिक जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. 
 
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच स्वित्झरलँड येथे निधन झाले. कुटुंबियांच्या इच्छेनुसार, त्यांच्यावर मोनॅको येथे केवळ जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत अंतिम संस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या निधनावर हॉलिवुडसह बॉलिवुड आणि जगभरातील सिने जगत आणि चाहत्यांकडून दुख व्यक्त केले जात आहे. 
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा... त्यांनी या 7 चित्रपटांमध्ये साकारली होती जेम्स बॉन्डची भूमिका...
बातम्या आणखी आहेत...