आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोळखी चेहऱ्यात दिसला भाऊराया, भावाचा चेहरा दान देणारी बहीण मिळणाऱ्याला भेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - कुटुंबातील एखाद्या सदस्याचा चेहरा दुसऱ्याच्या शरीरावर पाहण्याचा अनुभव कसा असतो, हे रिबेकाशिवाय दुसरे कोणी सांगूच शकणार नाही. मेरीलँडमधील रिबेका एव्हरसेनोने व्हर्जिनियामध्ये रिचर्ड नावाच्या व्यक्तीची भेट घेतली. रिचर्डवर तिच्या भावाचा चेहरा प्रत्यारोपित केला आहे. रिबेका पहिल्यांदाच रिचर्ड नाॅरिस(३९) याला भेटली तेव्हा तिने आधी त्याचा चेहरा न्याहाळला. मग तिने विचारले, ‘मी तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करू शकते का?’ रिचर्ड उत्तरला, ‘हो.’ रिबेका हळूहळू पुढे गेली, त्याचे कपाळ आणि गालांना स्पर्श केला. मग पुटपुटली...‘वा, यापेक्षा चांगले काय असू शकते? ज्याच्यासोबत माझे बालपण गेले आणि मी मोठी झाले, तो हा चेहरा आहे.’ या दोघांच्या भेटीचे चित्रीकरणही झाले. त्या डॉक्युमेंट्रीला ‘६० मिनिट्स’ असे नाव दिले आहे.

१९९७ मध्ये बंदूक स्वच्छ करताना रिचर्डकडून गोळी सुटली. या घटनेत त्याचा चेहरा विद्रूप झाला होता. चेहरा पूर्ववत करण्यासाठी त्याला ३० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. पण त्याचाही फायदा झाला नाही. तीन वर्षांपूर्वी रिबेकाचा भाऊ जोस एव्हरसेनोचा कार अपघातात मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी १५० डॉक्टरांच्या पथकाने ३६ तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर जोसचा चेहरा रिचर्डला प्रत्यारोपित केला. रिबेकाने सांगितले, ‘भावाच्या मृत्यूनंतर आम्ही त्याचे अवयव दान केले होते. त्याच वेळी रिचर्डच्या कुटुंबाचा फोन आला. त्यांनी जोसच्या चेहरा मागितला.
रिचर्डची आई जिवेन एव्हरसेनो म्हणाल्या, माझ्या तिन्ही मुली म्हणाल्या की आई, असे झाले तर तुझा मुलगा आणि आमच्या भावाला नवे आयुष्य मिळेल. माझा एकच प्रश्न होता, तो कसा दिसेल? डॉक्टर म्हणाले, शस्त्रक्रियेनंतर तो अगदी जोससारखा तर दिसणार नाही, पण पूर्ण बरा झाल्यानंतर त्याच्यात जोसची झलक अवश्य दिसेल.’ या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर वादही झाला. रिचर्ड आता सामान्य आयुष्य जगत आहे.
बातम्या आणखी आहेत...