अटलांटा - जरल तुम्ही तुमच्या पार्टनरला फसवत असातल तर जरा सावध व्हा. कदाचित कोणीतरी तुमच्यावर लक्ष्य ठेवत असेल. अमेरिकेच्या अटलांटामध्ये काहीसा असाच प्रकार पाहायला मिळाला. ही बाब अशा चीटर्ससाठी एक धडा आहे. येथे दोन बहिणींनी पतीला फसवणाऱ्या एका महिलेचां भांडाफोड केला आहे.
गेल्या बुधवारी अटलांटाच्या टर्नर फील्ड स्टेडियममध्ये एक बेसबॉल मॅच सुरू होती. यावेळी डेलना आणि ब्रायन हिनसन नावाच्या दोन बहिणी त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. स्टेडियममध्ये त्यांच्यासमोर एक जोडपं बसलेलं होतं. ती महिला मोबाईलवर कोणालातरी सारखे रोमँटिक मॅसेज करत होती. यावेळी तिचा पतीही तिच्यासोबत होता. तरीही ती दुसऱ्या पुरुषाबरोबर चॅट करण्यात व्यस्त होती. विशेष म्हणजे या महिलेने कोणाला शंका येऊ नये म्हणून तिच्या या मित्राचे नाव फोनमध्ये नॅन्सी नावाने सेव्ह केले होते. पण आपल्याला कोणीतही मागून पाहत आहे याची तिला जाणीवच नव्हती.
बहिणींनी केला भांडाफोड
या जोडप्याच्या अगदी मागे बसलेल्या डेलनाला ही महिला पतीला फसवत असल्याचे लक्षात आले. तिने तिच्या मोबाईल स्क्रीनचे फोटो काढले. एवढेत नाही तर तिने महिलेच्या पतीसाठी एक चिठ्ठीही ठेवली. त्यात लिहिले तुझी पत्नी तुला फसवत आहे. तिच्या मोबाईलमध्ये नॅन्सी नावाने एका व्यक्तिचा नंबर आहे. त्याला तिने खूप मॅसेजेस केले आहेत. त्याचे सर्व फोटो माझ्याकडे आहेत. तिने पुढे लिहिले, जर तुझ्या पत्नीने मॅसेज डिलिट केले तर मला संपर्क करू शकता. डेलनने तिच्या नंबरसह लिहिले होते की, सॉरी.. पण मला वाटले की, तुला याबाबत माहिती असायला हवे.
टि्वटरवर व्हायरल झाले फोटो
या घटनेच्या काही दिवसानंतर डेलनाची बहीण ब्रायनने महिलेच्या मोबाईलचे स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केले. ते व्हारल झाले आहेत. त्या व्यक्तिला चिठ्ठी दिल्याच्या दोन तासांनतर त्या व्यक्तीचा डेलनाला फोन आला होता. त्याने तिच्याकडे फोटो मागितले असे डेलनाने सांगितले. या जोडप्याच्या विवाहाला 29 वर्षे झाली आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, महिलेने तिच्या मित्राला पाठवलेल्या मॅसेजेसचे फोटो...