आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षीय विद्यार्थ्याने म्हटले \'अल्लाह\', शिक्षिकेने दहशतवादी समूजन पोलिसांनाच बोलावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहम्मद सुलेमान जन्मापासूनच ऑटिस्टिक आहे. - Divya Marathi
मोहम्मद सुलेमान जन्मापासूनच ऑटिस्टिक आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका ऑटिस्टिक शाळेत एका शिक्षिकेने अवघ्या 6 वर्षीय मुलाला दहशतवादी समजून चक्क पोलिसांनाच बोलावले. मोहम्मद सुलेमान असे नाव असलेला हा मुलगा वर्ग सुरू असताना आपल्याच विश्वात अल्लाह-अल्लाह असे म्हणत होता. आपल्याशीच बड-बड करताना तो बूम-बूमही बोलत होता. त्यावर त्याची वर्गशिक्षिका इतकी घाबरली की तिने बॉम्बच्या भितीने आपल्या इतर सहकाऱ्यांना वर्गात बोलावले. त्यावर दुसऱ्या टीचरने काहीच विचार न करता सरळ पोलिसांना फोन लावून आपल्या शाळेत दहशतवादी असल्याची तक्रार केली. 

 

द इंडिपेंडंट दैनिकाने फॉक्स न्यूज माध्यमाचा दाखला देत त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया जारी केली. मुलाचे वडील माहेर सुलेमान यांनी सांगितल्याप्रमाणे, शाळेतील शिक्षकांनी फक्त त्या मुलाच्या तोंडातून अल्लाह शब्द ऐकून पोलिसांना बोलावले. तो मुलगा जन्मापासूनच ऑटिस्टिक (मतीमंद) आहे. त्याला व्यवस्थित बोलताही येतन नाही. त्यातच शिक्षकांनी पोलिसांना शाळेत बोलावून तो मुलगा बोलत असल्याचा दावा केला. पोलिसांनी शाळेत आल्यानंतर चौकशी केली आणि माध्यमांशी संवाद साधताना कारवाईची काहीही गरज नाही असे स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...