आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्किन टाइट जिन्समुळे महिलेचे पाय सुजले, जिन्स फाडून केले मोकळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्मक छायाचित्र
अॅडिलेड (ऑस्ट्रेलिया) - स्किन टाइट (स्किनी) जिन्सचा महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा जिन्स घालणार्‍या महिलांचा रक्तपुरवठा थांबू शकतो. असेच एक प्रकरण ऑस्ट्रेलियात समोर आले आहे. स्किन टाइट जिन्स घातलेल्या एका 35 वर्षीय महिलेच्या पोटर्‍या आणि मांडी सुजली आणि तिला एवढ्या वेदना होऊ लागल्या की तिच्या शरीरावरील जिन्स फाडून वेगळी करावी लागली. जर्नल ऑफ न्यूरॉलॉजी, न्यूरोसर्जरी अँड सायकायट्री मध्ये यासंबंधीचा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे.
स्किन टाइट जिन्स घालून कित्येक तास केले काम
बीबीसीच्या वृत्तानुसार महिलेने स्किन टाइट जिन्स परिधान करुन कित्येक तास काम केले होते. संध्याकाळी तिचे पाय थंड पडले आणि घरातील साफ-सफाईचे काम करत असताना तिला चक्कर येऊन ती पडली. बराचवेळ ती जमीनीवर पडून होती, तिला स्वतः उठता येत नव्हते. जणूकाही तिच्या पायात शक्तीच राहिली नव्हती.
काय होतो त्रास?
डॉक्टरांचे म्हणणे आहे, की याला कंपार्टमेंटल सिंड्रॉम म्हटले जाते. स्किन टाइट जिन्स घातल्याने हा त्रास आणखी बळावतो. अॅडिलेड येथील महिलेवर उपाचर करणार्‍या डॉक्टरांना आढळून आले, की महिलेचे पाय गरम आहेत पण तिच्या पायांचे स्नायू कमकुवत झाले आहेत. स्किन टाइट जिन्सने तिच्या पायांचा खालच्या भागावर दबाव पडला त्यामुळे स्नायू दुखवाले. काही तासांच्या उपचारानंतर महिला पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहू शकली.
बातम्या आणखी आहेत...