आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तैवानी तरुणी लावतात रांगा, जेव्हा हॉटेलात पाय ठेवतो हा नोकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताइपे (तैवान)- एखादे हॉटेल खवय्यांचा खास अड्डा बनले असेल तर त्यामागे कारण एकच असते चविष्ट जेवण. फार फार तर दुसरे एक कारण म्हणजे स्वस्त जेवण हेही राहू शकते. यापेक्षा काही वेगळे कारण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी राहू शकत नाही. पण तैवानच्या एका हॉटेलने कमालच केली आहे. असा चिकणा नोकर ठेवला आहे, की सगळ्या मुली केवळ त्याच्या हातून जेवण घेण्यासाठी येतात. त्याने हॉटेलमध्ये पाय टाकला तरी हॉटेलसमोर रांगा लागतात. हा नोकर आता इंटरनेट सेलिब्रिटी झाला आहे.
ताइपेच्या बेतोउमध्ये हे छोटेसे हॉटेल आहे. येथे हा हॉट नोकर काम करतो. त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. पण त्याची एक झलक घेण्यासाठी आणि त्याच्या हातून जेवण करण्यासाठी अनेक तरुण आणि महिला येथे येतात. कधी कधी तर हॉटेलसमोर लांबच लांब रांगा लागतात. आकर्षक चेहरा, मजबूत बायसेफ, सिक्स पॅक अॅब्ज आदींमुळे हा नोकर फारच प्रसिद्ध झाला आहे. त्याला हॉटेस्ट बीन कस्टर्ड सेलरचा किताब देण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या हॉट नोकराचे फोटो... याला बघण्यासाठी येतात तैवानी तरुणी....