आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन, टॅब्लेटमध्ये असावा ‘बेडटाइम मोड’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगभरात स्मार्टफोनचे वेड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मोबाइलच्या अतिवापराने अनेक नव्या आजारांना जन्म दिला आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सुचवले आहे की, स्मार्टफाेन टॅब्लेटमध्ये ऑटोमॅटिक बेडटाइम मोड असावा. जो ऑन होताच मोबाइलमधून बाहेर पडणारा नील प्रकाश आपसूकच कमी व्हावा. जेणेकरून रात्री झोपण्याच्या वेळेस त्रास होणार नाही.संध्याकाळनंतर रात्र होताना प्रकाश कमी कमी होत जातो. यादरम्यान आपल्या शरीरात मेलाटोनिन हे झोप आणणारे संप्रेरक स्रावू लागते. ही प्रक्रिया संशोधनाअंती उलगडली.
स्पेक्ट्रमधून निघणाऱ्या निळ्या आणि हिरव्या प्रकाशाच्या वेव्हलेंग्थ झाेपेच्या प्रक्रियेला अडथळा आण्ू शकतात.

लंडनच्या इव्हेलिना बाल रुग्णालयाचे डॉक्टर पॉल ग्रिनग्रास यांनी प्रकाश उत्सर्जन प्रक्रियेचा अभ्यास केला आहे. त्यात ते म्हणतात, सध्याच्या घडीला मोठ्या आकाराची स्क्रीन असलेल्या उपकरणांची चलती आहे. यामुळे ते अधिक प्रखर आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नील प्रकाश उत्सर्जित होतो. दिवसा वापरासाठी ही उपकरणे उत्तम आहेत. मात्र, रात्री वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. रात्री डोळ्यांसमोर ही उपकरणे असल्यास तुम्हाला एक तास उशीराने झोपे येते, असे निष्कर्षही उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

डॉ. ग्रिनग्रास पुढे म्हणाले, शरीरातील जैविक घड्याळ बिघडवणारा तसेच नैसर्गिक झाेपेला विलंब करणारा नील प्रकाश कमी करणारी फिल्टर यंत्रणा स्मार्टफोनमध्ये असली पाहिजे. तसेच फोनमध्ये एक बेडटाइम मोडही असावा. जो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रात्री आपोआप नील प्रकाशाची तीव्रता घटवेल. नील आणि हरीत रंगाची तीव्रता कमी करण्याची सेटिंग असलेली सध्याच्या काही अॅप्सची नावेही त्यांनी सूचवली. त्यांचे अध्ययन जर्नल फ्रंटिअर्स या नियतकालिकात प्रकाशित झालेले आहे.
बातम्या आणखी आहेत...