आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला गरीब म्हटलोच नाही, स्नॅपचॅटचे सीईओ स्पीजल यांचा यू टर्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील असंख्य युवकांमध्ये प्रचंड लोकप्रीय असलेल्या फोटो सोशल मीडिया स्नॅपचॅटचे सीईओ वादात भारतामध्ये वादात अडकले आहेत. सीईओ इवान स्पीजल कथितरीत्या आपले अॅप भारतासारख्या गरीब राष्ट्रांसाठी नसल्याचे म्हणाले होते. यानंतर देशभर सोशल माध्यमांवर संताप उमटला असताना आपण असे म्हणालोच नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

हे होते प्रकरण
स्नॅपचॅटचा माजी कर्मचारी अॅन्थोनी पॉम्पलियानो याने सांगितल्याप्रमाणे, सीईओ स्पीजल यांनी एका चर्चेत स्नॅपचॅट हे अॅप केवळ उच्चभ्रू आणि श्रीमंत देशांसाठी आहे. भारतासारख्या गरीब देशांसाठी नाही असे म्हटले होते. स्पीजल यांच्याकडे अॅपमध्ये जागतिक स्तरावर सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती असा दावा अॅन्थोनी यांनी केला. यावरून देशभरातील लाखो भारतीय युवकांनी स्पीजल यांच्यावर आपला रोष व्यक्त केला. 
 
सीईओंचे स्पष्टीकरण
अॅन्थोनी यांनी स्पीजल यांच्या विरोधात जानेवारी महिन्यात एक खटला दाखल केला होता. यात त्यांनी सीईओंच्या भारताबद्दलचे विचार मांडले. प्रत्यक्षात, अॅन्थोनी यांना स्नॅपचॅटबद्दल काहीही माहिती नाही. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप सुद्धा खोटे आहेत असा दावा स्पीजल यांनी केला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...