आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा राजनचा बिझनेस पार्टनर आहे झाकिर नाइक, असा बनला मुस्लिम धर्मगुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क -  भारतात विविध आरोपांमुळे फरार असलेल्या झाकिर नाइकला मलेशियाने स्थायी नागरिकत्व दिले आहे. झाकीर, जुलै 2016 पासून देशातून फरार आहे. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यात आली असून या आठवड्यात हे आरोपपत्र विशेष न्यायालयासमोर सादर केले जाईल. या अनुषंगाने आम्ही आपल्याला झाकीर नाईक यांच्या 10 वादग्रस्त वक्तव्ये घेऊन आलो आहे.

झाकीर, छोटा राजनचा पार्टनर; एनआयएचा खुलासा...
- एनआयएने 18 नोव्हेंबर 2016 रोजी मुंबईत नाईकविरोधात गुन्हा दाखल केला होता.
- झाकिर नाईक आणि अंडरवर्ल्ड माफिया छोटा राजन बिझनेस पार्टनर आहे. नाईकचा पासपोर्ट जब्त केल्यानंतर एनआयएने हा खळबळजनक खुलासा केला होता. 
- झाकिर नाईकने राजन कंस्ट्रक्शन कंपनीत 226 महागडे आणि आलिशान व्हिलामध्ये पैसा गुंतवला होता.
- झाकिर याने राजनचा पेसिफिक हाऊसिंग प्रोजेक्ट खरेदी करून त्याचे नाव 'पीस सिटी' असे केले होते.
- इतकेच नाही तर नाईकने राजनचा मित्र परव्हेज खानच्या पुण्यातील प्रोजेक्टमध्येही पैसा गुंतवला आहे.
- बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीरचे नाव दहशतवादाशी जोडण्यात आले होते.
- नंतर त्याच्या विरोधात चौकशी सुरु करून त्याचा एनजीओ 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन'वर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर झाकीर देशाबाहेर आहे. तो सौदी अरबमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, छोटा राजन सध्या तुरुंगाची हवा खात आहे.
- झाकिरची इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला (आयआरएफ) केंद्रीय गृह मंत्रालयाने बेकायदा संस्था म्हणून घोषित केले आहे.
 
कोण आहे झाकीर नाईक?
- झाकिरचा 18 ऑक्टोबर 1965 रोजी मुंबईत झाला होता.
- त्याने एमबीबीएस पदवी घेतली आहे. झाकीर एक मुस्लिम धर्मगुरु, रायटर आणि प्रवक्ता आहे.
- याशिवाय तो इस्लामिक रिसर्च फाउंडेशन अर्थात आयआरएसचा संस्थापकीय अध्यक्ष आहे.
- फेसबुकवर त्याचे 1 कोटी 14 लाख फॉलोअर आहेत. झाकीरवर यूके, कॅनडा, मलेशियासह 5 देशांमध्ये बंदी आहे.
- इस्लामिक फाउंडेशनला देश-विदेशातून भरपूर निधी मिळतो.
- तो एक शाळा चालवत होता. त्यात लेक्चर, ट्रेनिंग, हाफिज बनवण्यासाठी क्लास आणि इस्लामिक ओरिएंटेशन प्रोग्राम चारवतो.
- पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने 2012 नंतर त्याने मुंबईत कोणतीही कॉन्फ्ररन्स घेतली नाही.
 
असा बनला मुस्लिम धर्मगुरू
- एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर साऊथ आफ्रिकन प्रीचर अहमद दीदत यांच्या व्याख्यानाने झाकीर अत्यंत प्रभावीत झशला. नंतर त्याने डॉक्टरी पेशाऐवजी धर्म प्रचारक बनला. 
- मुंबईतील डोंगरी भागात एका बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरवर झाकीरचे ऑफिस आहे.
- यात अनेक कॅबिन आहेत. ऑफिसात कुरान, हदीससह अ‍नेक इस्लामी पुस्तके ठेवलेली आहेत. - येथे झाकिरचे वर्कस्टेशन आहे. इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या (आयआरएफ) नावाने ते ओळखले जाते. झाकीरने 1991 मध्ये या संस्थेची स्थापना केली होती.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... झाकीर नाईकचे वादग्रस्त वक्तव्ये...
बातम्या आणखी आहेत...