आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिका वेगाने विकसित होणारा प्रदेश : आेबामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैरोबी- दक्षिण आफ्रिका खंड जगात सर्वाधिक वेगाने विकसित होण्याचा प्रयत्न करत आहे. गरिबीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मध्यमवर्गीय वाढू लागले आहेत. उद्योजकांची संख्याही वाढताना दिसत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी म्हटले आहे.
येथील उद्योजकीय परिषदेत मार्गदर्शन करताना आेबामा बोलत होते. खरे तर मला अनेक दिवसांपासून आफ्रिकेत येण्याची इच्छा होती. आफ्रिकेतील अनेक भागांत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोठे बदल होऊ लागले आहेत. चित्र झपाट्याने बदलू लागले आहे. केनियाला भेट देणारा पहिला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून मला खूप अभिमान वाटतो. माझे वडील या भागातील होते. म्हणूनच ही भेट तितकीच खासगी आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री आेबामा यांचे केनियात आगमन झाले. राष्ट्राध्यक्ष उहुरू केनयाट्टा यांनी त्यांचे स्वागत केले.

दहशतवाद्यांची धमकी
नैरोबीतील उद्योजकीय परिषदेवर दहशतवाद्यांची नजर असून हल्ल्याचा धोका अाहे, असा इशारा अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाने दिला होता. त्यामुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. याचवर्षी एप्रिलमध्ये विद्यापीठात झालेल्या हल्ल्यात १४७ जणांचा मृत्यू झाला होता.