आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाच्या तणावाने ब्रिटन असमाधानी देश, वर्षभरामध्ये १८ हजार किशोरवयीन रुग्णालयात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन : सोशल मीडियावर सक्रिय ब्रिटिश किशोरवयीन स्वत:चेच नुकसान करून घेत नाहीत तर त्यांच्या या अाहारी जाण्याच्या वृत्तीमुळे ब्रिटनचे असमाधानी देशात रूपांतर झाले आहे. या अतिविकसित देशात या वर्षी मानसिक स्वास्थ्यासाठी १८,७७८ किशोरवयीनांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
विशेष म्हणजे नैराश्याच्या या प्रकारांत वर्षभरात १४% वाढ झाली. गेल्या वर्षी ही समस्या असणारी १६,४१६ प्रकरणे समोर आली होती.

नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू चिल्ड्रेनने(एनएसपीसीसी) इंग्लंड व वेल्समधील आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार ११ ते १८ वयाचे किशोरवयीन फेसबुक, टि्वटर व इंस्टाग्रामसारख्या सोशल साइट्ना बळी पडले.
याची एवढी सवय जडते की बाहेरच्या जगाचा संपर्कच तुटतो. यामुळे पुढे नैराश्य येते. त्यातून बाहेर पडण्यासाठी बरेच जण स्वत:ला इजा पोहोचवतात. उदा. गरजेपेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या घेणे, नसा कापणे.काहींनी आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे.
एनएसपीसीसीचे मुख्य कार्यकारी पीटर व्हॅनलेस म्हणाले, आम्ही अशा व्यक्तींच्या मदतीसाठी मोहीम राबवितो. वर्षभरात १८,४७१ लोकांनी हेल्पलाइनवर मदत मागितली. चाइल्ड केअर संस्थेचे डॉ. मॅक्स डेव्ही म्हणाले, नैराश्याची समस्या प्रारंभीच ओळखणे गरजेचे ठरते. उशीर झाल्यास उपचार कठीण होतात.
आजकाल प्रत्येक मुलाच्या हातात मोबाइल-टॅब आला. त्यामुळे याची सुरुवातही शाळेपासूनच व्हायला हवी. समस्या कळण्यासाठी सरकारने सर्व शाळांमध्ये मोहीम राबवावी. मुलांना नैराश्यातून बाहेर पडण्यासाठीचे शिक्षणही द्यावे.
नैराश्यग्रस्त तरुणांच्या मदतीसाठी सरकारने रुग्णालयांना दिले ११९ कोटी रुपये
आरोग्य विभागाच्य प्रवक्त्याने सांगितले, सोशल मीडियामुळे निर्माण झालेल्या समस्येची सरकारला जाणीव आहे.
मानसिकदृष्ट्या आजारी व निराश व्यक्तींच्या मदतीसाठी योजना आखली आहे. त्यासाठी रुग्णालयांना १.४ अब्ज पाउंड(सुमारे ११९ कोटी रुपये) राखीव निधीची तरतूद केली आहे. चाइल्ड केअरसारख्या संस्थांना मदत मिळावी,यासाठी एनएसपीसीसीने वाढीव निधीची मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...