आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रहालयाजवळ दहशतवादी कट उधळला, पॅरिसमधील घटनेत जवानासह हल्लेखोर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संशयित व्यक्ती म्यूझियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होता. - Divya Marathi
संशयित व्यक्ती म्यूझियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होता.
पॅरिस- पॅरिसमधील लुव्र संग्रहालयाजवळ शुक्रवारी सैनिकावर चाकू हल्ल्याची घटना घडली. त्यात सैनिक जखमी झाल्याने सुरक्षा दलाने गोळीबार केला. पाच गोळ्या लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या हल्लेखोराला कोठडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पॅरिसच्या जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयात मोनालिसासह काही मौल्यवान कलाकृतींना ठेवण्यात आले आहे. हा हल्लेखोर लुव्रच्या व्यापारी संकुलाजवळ दाखल झाला होता. त्याने इस्लामिक घोषणाबाजी करत सैनिकावर हल्ला केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्यास प्रत्त्युत्तर दिले. हल्लेखोराजवळ स्फोटके सापडलेली नाहीत. हा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न होता, असा दावा पंतप्रधान बर्नार्ड केजनेव्ह यांनी केला. हल्ल्याच्या वेळी लुव्र संग्रहालयात जवळपास २५० लोक होते. सुदैवाने त्यापैकी कुणालाही दुखापत झालेली नाही. 
 
२०१५ मध्येही हल्ले
फ्रान्समध्ये अनेक मोठे दहशतवादी हल्ले यापूर्वीही झाले आहेत. चार्ली हेब्दो कार्यालयावरील हल्ला त्यात सर्वांत चर्चिली गेलेली घटना ठरली होती. त्या शिवाय एका उत्सवादरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८६ लोकांना ट्रकने चिरडले होते. दहशतवादी हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर लुव्र संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होऊन वार्षिक २० लाखांवर आली होती.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...