आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादवीने त्रस्त सोमालियातील 26 लाख भुकेल्यांना पुरवली होती अमेरिकेने रसद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सिनियर जॉर्ज डब्ल्यू बुश सोमालयीन नागरिकांशी संवाद साधताना - Divya Marathi
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सिनियर जॉर्ज डब्ल्यू बुश सोमालयीन नागरिकांशी संवाद साधताना
इंटरनॅशनल डेस्क- सोमालियाच्या सैन्य दलाने कंदाला शहरास दहशतवाद्यांच्या ताब्यातून अखेर सोडवले. ऑक्टोबरपासून हे शहर दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. या ताज्या घटनेने सोमालियातील 24 वर्षापूर्वीच्या सोमालियातील यादवीची आठवण झाली. 26 लाख लोकांना पुरवले अमेरिकेने अन्न-पाणी....
- 1992 मध्ये आजच्या दिवशी सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये 1800 अमेरिकी नौदल सैनिक दाखल झाले होते.
- अमेरिकी नौदलाचा उद्देश उपाशी असलेल्यांना अन्नपदार्थांचा पुरवठा करणे, असा होता.
- अमेरिकेच्या सैन्याने डझनावर देशांतून आलेल्या सैनिकांचे देखील नेतृत्व केले.
- 1991 मध्ये हुकूमशहा मोहंमद सियाद बर्रे यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर बंडखोर नेत्यांनी भुकेचा सामना करणाऱ्या देशाला ओलिस ठेवले.
- बंडखोर गटाच्या बंदूकधाऱ्यांशी आपला मुकाबला होईल, अशी अमेरिकेच्या सैनिकांना अपेक्षा होती.
- परंतु त्यांचे जगभरातील प्रसारमाध्यमांनी स्वागत केले. मरिन्सचा उद्देश मोगादिशू विमानतळ बंदर क्षेत्रास सुरक्षितता प्रदान करणे, असा उद्देश होता.
- जेणेकरून गरजूंपर्यंत खाद्यपदार्थ औषधी पोहोचवणे शक्य होऊ शकेल. यात अमेरिकेला यश आले. यावेळी तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष सीनियर जॉर्ज बुश यांनी नंतर सोमालियाला भेट दिली होती.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, 24 वर्षापूर्वी कशी स्थिती होती सोमालियात आणि अमेरिकन सैनिकांनी अशी केली होती मोलाची मदत...
बातम्या आणखी आहेत...