आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Facts About The Partition Of India And Pakistan

फाळणीनंतर मालदातील घरांवर लागले होते पाकिस्तानचे झेंडे, वाचा FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
1947 साली झालेली भारत पाकिस्तानची फाळणी ही केवळ या दोन देशांसाठीच नव्हे संपूर्ण जगाच्या इतिहासातील एक अत्यंत लक्षणीय घटना म्हणावी लागले. प्रामुख्याने पंजाब प्रांतातील मुस्लीम बहुल भाग वेगळा करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटीशांनी ही फाळणीची प्रक्रिया पूर्ण करून भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळे अधिकार बहाल केले होते.

मुस्लीमबहुल भागाला भारतापासून वेगळे करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने पंजाब प्रांतातील मुस्लीमबहुल भागाचा समावेश होता. त्यामुळेच फाळणीच्यावेळी झालेल्या दंगलींमध्ये शीख समुदायाला मोठी हानी सहन करावी लागली होती. मुस्लीमांसाठी स्वतंत्र देशाची किंवा पाकिस्तानची मागणी ही प्रामुख्याने ऑल इंडिया मुस्लीम लीगच्या वतीने करण्यात आली होती. मुस्लीमांची संख्या देशातील लोकसंख्येच्या एक चतुर्थांश असल्यामुळे ते अल्पसंख्याक नाहीत, असे मुस्लीम लीगचे मत होते. त्यामुळे त्यांच्या संस्कृती आणि परंपरांचा विचार करता स्वतंत्र देश देण्याची मागणी त्यांनी केली होती.

3 जून रोजी फाळणीबाबतची पूर्ण योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार पंजाब (आताचा पाकिस्तान)आणि बंगाल (आताचा बांगलादेश) या दोन्ही प्रांतांना एक निर्णय घेण्यास सांगण्यात आले. या दोन्ही प्रांतांना एकत्र राहायचे की स्वतंत्र व्हायचे याचा निर्णय त्यांना घ्यायचा होता. त्यावर या दोन्ही प्रांतांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, फाळणीबाबतची काही रंजक माहिती...