आपण अनेकदा टिव्हीमध्ये एखाद्या कारवाईच्या वेळी किंवा चित्रपटांमध्ये स्नायपर्स पाहत असतो. त्याचबरोबर अनेकदा व्हिडीओ गेममध्येही आपण त्यांना पाहतो. पण या माध्यमातून केवळ एखाद्याला नेम लावून उडवणारे अशीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आलेली असते. पण हे काम करताना, या स्नायपर्सना किती विविध गोष्टींना सामोरे जावे लागते याबाबत आपल्याला माहिती नसते. शत्रूचा कर्दनकाळ बनून अनेक संकटातून देशाला वाचवणाऱ्या या स्नायपर्सबाबतचे असेच काही रंजक FACTS आपण आज जाणून घेणार आहोत.