आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाण करणारे करून गेले, पण स्वच्छता आपण करू, कॅनडामध्ये मोदींची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो - घाण करणारे करून गेले, परंतु ही घाण आपण स्वच्छ करूया, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कॅनडात भारतीय समुदायाशी संवाद साधला. मागील यूपीए सरकारवर त्यांनी नाव न घेता अशी टीका केली. मोदी बोलत असताना त्यांचा नावाच्या घोषणा सुरू होत्या. ते म्हणाले, भारत खूप मोठा आहे. अशा देशात खूप घाण, गडबड होऊ शकते. स्वच्छता करण्यासाठी वेळ लागेल. परंतु हे काम करावे लागेल. कारण आता देशाचा दृष्टिकोन बदलला आहे. देश सर्व प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करत आहे. त्यावर एकच आैषध आहे, असे म्हणताच गर्दीतून पुन्हा ‘मोदी-मोदी ’ अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या. त्यावर मोदी म्हणाले, नाही. मी नाही. विकासच देशाच्या प्रत्येक समस्येची सोडवणूक करू शकतो.

‘स्किल्ड इंडिया’ अशी आेळख
पहिल्यांदा देशाची प्रतिमा स्कॅम इंडिया (घोटाळ्यांचा देश) अशी होती. मात्र आता स्किल्ड इंडिया (कुशल भारत) अशी आेळख मिळायला हवी. विकासाच्या दिशेने पावले पडू लागली आहेत. गेल्या दहा महिन्यांत भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक शासन प्रणाली समोर आली आहे. त्यामुळे देशात विश्वासाचे वातावरण बनले आहे.