आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Products From Consumer Electronic Show Of Las Vegas

हे पादत्राण घेईल आपल्या आरोग्याची काळजी, पाहा अशाच Hightech वस्तू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास | अमेरिकेतील लास वेगासमध्ये ६ ते ९ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये (सीईएस) अनेक नवनवीन उत्पादने सादर करण्यात आली. भावी पिढीसाठी आवश्यक काही उत्पादने आकर्षणाचे केंद्र ठरली. यंदा या प्रदर्शनात ३,६०० पेक्षा अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. सीईएस वेबसाइटनुसार, ग्राहकांसाठी आवश्यक तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांसाठी सीईएस जगातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे. १९६७ मध्ये सीईएसचे पहिले प्रदर्शन भरले होते. तेव्हापासून नवीन हजारो उत्पादने या प्रदर्शनात सादर झाली.
जगातील पहिले बुद्धिवान पादत्राण
डिजिटसोलचे हे पादत्राण म्हणजे पहिले इंटेलिजंट पादत्राण मानले जाते. तळपायांना ३८ अंश सेल्सियसपर्यंत ऊब देणारे हे पादत्राण आपोआप घट्ट किंवा सैल होते. याचे नियंत्रण अॅपमार्फत होते. शरीरातील कॅलरी आणि अंतर मोजण्याचीही यात क्षमता आहे. सोबत आपल्या आरोग्याचीही ते काळजी घेते. याची किंमत ४५० डॉलर असून अमेरिका-युरोपीय बाजारपेठेत ते सप्टेंबरमध्ये दाखल होईल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आपल्यासाठी उपयोगी ठरतील अशीच काही इतर उत्पादने...